शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

निधी अफरातफर प्रकरणी सुनावणी आज

By admin | Updated: April 21, 2017 00:40 IST

चौकशी होऊन आणि चौकशीअंती सरपंच आणि तत्कालीन ग्रामसेवक हे दोषी आढळूनही चार महिने लोटूनही दोषींवर कारवाई झाली नाही.

जि.प.अध्यक्षांच्या गावातील प्रकरण : माहितीच्या अधिकारातून भ्रष्टाचाराचा भंडाफोडभंडारा : चौकशी होऊन आणि चौकशीअंती सरपंच आणि तत्कालीन ग्रामसेवक हे दोषी आढळूनही चार महिने लोटूनही दोषींवर कारवाई झाली नाही. सुनील चाफले यांनी दोषींवर कारवाई आणि विकासकामासाठी आलेल्या रक्कमेची वसुली करावी, अन्यथा आत्मदहन कण्याचा इशारा प्रशासनाला दिला. त्यामुळे याप्रकरणाची सुनावणी २१ एप्रिलला मुख्यकार्यपालन अधिकारी यांच्या दालनात होणार आहे.तालुक्यातील मुरमाडी/तूपकर येथील सरपंच प्रमिला रामचंद्र चौधरी व तत्कालीन ग्रामसेवक दत्ता पोहरकर यांनी गावातील विकासकामासाठी येणाऱ्या निधीचा संगनमत करून गैरवापर करून अपहार केल्याचे निदर्शनास येत आहे. तत्कालीन ग्रामसेवक हे मुरमाडी/तुपकर आणि रामपुरी या दोन्ही गावाचा ग्रामसेवक म्हणून अतिरिक्त कारभार असतांना अनेक गैरकारभार केल्याचे आढळून येते. नाली, विहीर, आवरभिंत बांधकाम अशा प्रकरणांमध्ये त्यानी सरपंचाच्या संगनमताने गैरकारभार केल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट होत आहे. चौकशी होऊन आणि चौकशीअंती सरपंच आणि तत्कालीन ग्रामसेवक हे दोषी आढळूनही चार महिने लोटूनही दोषींवर कारवाई झाली नाही. दोषींवर कारवाई करण्यात यावी, यासाठी मुरमाडी/तुपकर ग्रामपंचायत सदस्य सुनीत चाफले यांनी २७ एप्रिलला जिल्हा परीषद भंडारा येथे आत्मदहन करण्याचा इशारा शासनाला दिला आहे.मुरमाडी/तुपकर आणि रामपुरी या दोन्ही गावाचा ग्रामसेवक म्हणून अतिरिक्त कारभार असतांना ग्रामसेवक दत्ता पोहरकर यांनी २०१५-१६ च्या काळात श्रीकृष्ण भोयर, हिवराज निम्बार्ते, विश्वनाथ नेवारे, सुभाष निम्बार्ते, नवनीत देशमुख अशी पाच मजूर ४५ दिवस दोन ग्रामपंचायतीमध्ये कामावर दाखवून १३ व्या वित्त निधी रस्ता खडीकरण आणि ग्रामनिधीचे ११,२५० रुपयांची अफरातफर केल्याचे चौकशी अंती लक्षात आले होते. यावर गट विस्तार अधिकारी ब्राह्मणकर यांनी निष्कर्ष काढून एकच मजूर एकाच दिवशी दोन्ही ग्रामपंचायतीच्या कामावर जाऊ शकत नाही आणि त्या सर्व मजुरांचे बयान घेतले असता त्यानी रामपुरी येथे कामावर गेले नाही, असे नोंदविले होते. याउपरही ग्रामसेवक दत्ता पोहरकर यांनी नियम १९६४ नुसार शिस्त भंग केला आणि अपहार रक्कमेची वसुल करावी असे ठरविले असताना सुद्धा रक्कम जमा केली नाही. तसेच दत्ता पोहरकर यांनी त्या पाचही मजुरांची खोटी सही अंगठे घेऊन रक्कमेचा अपहार केला म्हणून यांच्यावर कठोर कारवाईची मागणी ग्रामपंचायत सदस्य सुनील चाफले यांनी केली.लाखनी खंड विकास अधिकारी बागडे, विस्तार अधिकारी चकोले, गट विस्तार अधिकारी ब्राह्मणकर यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली. मात्र अद्यापर्यत दोषींवर करवाई झाली नाही, म्हणून सुनील चाफले यांनी उभा केलेला लढा यशस्वी होईल काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (नगरप्रतिनिधी)