पैसे पडले सांगितले अन् ४९ हजारांची बॅग पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 03:57 PM2021-11-30T15:57:24+5:302021-11-30T17:20:56+5:30

बँकेतून पैसे काढून घरी जाताना एका अनोळखी इसमाने पैसे खाली पडल्याचे सांगून एका व्यक्तीची ४९ हजार रुपये असलेली बॅग लंपास केली.

He said the money had fallen and snatched another bag of Rs 49,000 | पैसे पडले सांगितले अन् ४९ हजारांची बॅग पळविली

पैसे पडले सांगितले अन् ४९ हजारांची बॅग पळविली

Next
ठळक मुद्देभंडारातील घटना : वाटमारीचा नवा प्रकार

भंडारा : बँकेतून पैसे काढून घरी जाताना एका अनोळखी इसमाने पैसे खाली पडल्याचे सांगून एका व्यक्तीची ४९ हजार रुपये असलेली बॅग लंपास केली. ही घटना येथील केशव भवनासमोरील स्टेट बँकेजवळ घडली. अशा पद्धतीने बॅग पळविण्याची ही भंडारा शहरातील पहिलीच घटना असावी.

खात रोडवरील शिवनगरीतील मधुकर गोमाजी लेंडे (५७) हे स्टेट बँकेत पैसे काढण्यासाठी सोमवारी गेले होते. आपल्या खात्यातून ४९ हजार रुपये काढून एका कापडी बॅगमध्ये ठेवले. ती बॅग आपल्या मोटारसायकलला लटकवली. त्याचवेळी एका अनोळखी व्यक्तीने आवाज दिला. तुमचे पैसे पडले आहेत. त्यांनी मागे वळून पाहिले तेव्हा जमिनीवर १०० व २० रुपयांच्या काही नोटा पडलेल्या दिसल्या. त्या उचलण्यासाठी वाकले असता मोटारसायकलवर लटकविलेली ४९ हजारांची बॅग भामट्याने लंपास केली. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. मात्र तोपर्यंत भामटा पसार झाला होता.

दरम्यान, पैसे लुटण्याचे अनेक प्रकार यापूर्वी भंडारा शहरात उघडकीस आले. परंतु पैसे पडले असे सांगून लुटण्याचा प्रकार पहिल्यांदाच उघडकीस आला. भामटे नवनवीन शक्कल लढवून पैसे पळवत असल्याचे यावरून पुढे आले. याप्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास सहायक फौजदार शेंडे करीत आहेत.

Web Title: He said the money had fallen and snatched another bag of Rs 49,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.