शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
2
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
3
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
6
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
7
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
8
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
9
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
10
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
11
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
12
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
13
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
14
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
20
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ लाकुडफाटा वनपरिक्षेत्राधिकाऱ्याच्या घरी

By admin | Updated: September 8, 2016 00:33 IST

भंडारा उपवन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कोका विश्रामगृहाची दुरुस्ती करण्यात आली.

लाकडाची अफरातफर : वनपरिक्षेत्राधिकाऱ्याचे अनेक प्रकरण आले बाहेरप्रशांत देसाई भंडाराभंडारा उपवन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कोका विश्रामगृहाची दुरुस्ती करण्यात आली. यावेळी निघालेला लाकुड फाटा लिलावात काढण्याचे आदेश तत्कालीन उपवनसंरक्षक प्रवीणकुमार यांनी दिले होते. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवत भंडारा वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेश्राम यांनी सर्व लाकुड साहित्य भंडारा येथे बोलावून अफरातफर केली तर काही साहित्य त्यांच्या क्वॉर्टरमध्ये दडवून ठेवलेला आहे. लाखो रुपये किमतीचे सागवान साहित्य ज्यात चौकटसह दरवाजे, फाटे, सिमेंट टिन पत्रे व अन्य लाकडी साहित्य कोका विश्रामगृहाच्या दुरुस्तीदरम्यान काढण्यात आले. हे सर्व साहित्य गडेगाव लाकूड आगारात नेऊन लिलावात काढण्याचे आदेश तत्कालीन उपवनसंरक्षक प्रवीणकुमार यांनी वनपरिक्षेत्राधिकारी यांना बजावले होते. मात्र प्रवीणकुमार यांची भंडारा येथून बदली होताच वनपरिक्षेत्राधिकारी मेश्राम यांनी लिलावात काढण्याच्या त्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून स्वत:च्या पदाचा गैरवापर करताना कोका विश्रामगृहाचे वनपाल खान यांना पत्रव्यवहार केला.या पत्रव्यवहारात त्यांनी सर्व लाकूड साहित्य भंडारा येथे त्यांच्या अधिनस्थ बोलाविले. यातील काही साहित्यांची अफरातफर केल्याची चर्चा वनकर्मचाऱ्यांमध्ये सुरु आहे. सदर प्रकरण ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीने वनपरिक्षेत्राधिकारी मेश्राम यांनी अफरातफर केलेल्या लाकुडसाहित्यांची जमवाजूत करून पूर्ववत स्वत:च्या क्वॉर्टर परिसरात आणून टाकले. यातील सुस्थितीत असलेले सागवान फाटे व अन्य काही साहित्य त्यांनी चोरी जात असल्याचा बनाम करून ते स्वत:च्या क्वॉर्टरमध्ये ठेवले. वनविभागाची मौल्यवान वनसंपदा चोरीला गेल्याचे अद्याप एकही प्रकरण वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय परिसरात घडलेले नाही. त्यामुळे हा लाकूड साठा चोरी जात असल्याचा बनाम असल्याचे उघडकीस येते. वनपरिक्षेत्राधिकारी मेश्राम यांनी सदर लाकूडसाठा क्वॉर्टरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी व त्याचे वेगवेगळे भाग बनवून ठेवले आहेत. ही बाब प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांच्या क्वॉर्टरमध्ये प्रत्यक्षात बघितली आहे. या एका प्रकरणावरून मेश्राम यांचे अनेक प्रकरण आता बाहेर येऊ लागले आहेत. वनविभागाच्या विभागीय कार्यालयाची दुरुस्ती करण्यात आली. यावेळी तेथील काही लाकडी कपाटही गायब झाल्याची बाब आता उघडकीस आली आहे. यातीलच काही लाकडी कपाट मेश्राम यांच्या क्वॉर्टर परिसरात ठेवण्यात आले असल्याने त्यांनी ते कुठल्या कारणाने आणले याबाबत अनभिज्ञता आहे.