शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

मेंढा, गढपेंढरीत हर घर नळ, गावकरी मात्र तहानलेलेच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 12:54 IST

ऐन उन्हाळ्यात संकट : ग्रामस्थांनी दिला उपोषणाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी: तापमानाचा पारा चढला असून, ग्रामीण भागात दैनंदिन गरजेपुरते पाणी मिळणेही कठीण झाले आहे, तर काही गावांत घरी नळ लावून ठेवले, पण तेही शोभेचे ठरत आहे. नागरिक तहानलेलेच असल्याचे चित्र लाखनी तालुक्यातील मेंढा, गढपेंढरी येथे बघायला मिळत आहे.

लाखनी तालुक्यातील पोहरा या गट ग्रामपंचायतींतर्गत येत असलेल्या मेंढा, गढपेंढरी या गावात मागील काही महिन्यांपूर्वी हर घर नल योजनेंतर्गत नळ बसविण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांना वाटले की या उन्हाळ्यात तरी पाण्याचे संकट येणार नाही. मात्र कंत्राटदाराच्या उदासीन धोरणामुळे हे दोन्ही गावभर उन्हाळ्यातही तहानलेले आहेत.

गावात पाण्याचे इतर स्त्रोत नाहीत. त्यामुळे अनेक कुटुंबांना पिण्यासाठी पाणी अनेक किमी अंतराहून आणावे लागत आहे. परिणामी ग्रामस्थांमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे. तत्काळ पाण्याची सुविधा उपलब्ध करून न दिल्यास उपोषण करण्याचा इशाराही आता ग्रामस्थांनी दिला आहे.

नळ योजना ठरली पांढरा हत्तीशासन मोठ्या प्रमाणत 'हर घर नल, हर घर जल' योजनेचा गाजावाजा करताना दिसत आहे. मात्र अनेक गावांत या योजनेची अंमलबजावणी पूर्णपणे झालेली नाही, तर काही ठिकाणी संथगतीने काम होत आहेत. मेंढा, गढपेंढरी या गावात काही महिन्यांपूर्वी काम झाले आहे, आता मात्र थोडे काम बाकी असताना कंत्राटदाराकडून हे काम पूर्ण करण्यास विलंब होत असल्याचा आरोप गावकरी लावत आहे. पाण्याची अत्यंत गरज असताना ही नळ योजना पांढरा हत्ती ठरत आहे.

गत काही महिन्यांपूर्वी नळ लावण्यात आले. जलकुंभाचे बांधकाम करण्यात आले, मात्र अद्यापही नळाला पाणी आले नाही. उन्हाळा सुरू आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, मात्र प्रशासन सुस्त आहे. अधिकाऱ्यांनी ही समस्या मार्गी लावावी, अन्यथा ग्रामस्थांच्या पुढाकारातून आंदोलन करण्यात येईल.- रोहित साखरे, सामजिक कार्यकर्ता

मेंढा, पोहरा येथे कंत्राटदाराला काम सुरू करण्याबद्दल ग्रामपंचायतकडून सूचना देण्यात आल्या आहेत. लगेच कामाला सुरुवात होत आहे. परिसरात पाण्याची पर्यायी व्यवस्था आहे. वाढत्या तापमानामुळे पाण्याची पातळी खोल गेली आहे. सदर नळ योजना तत्काळ सुरू करण्याची कारवाई केली जात आहे.- रामलाल पाटणकर, सरपंच, पोहरा

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईWaterपाणीwater shortageपाणीकपातwater transportजलवाहतूक