शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी हातचे धानाचे पीक गेले

By admin | Updated: November 3, 2014 23:20 IST

या परिसरातील गोसे बुज गोसीखुर्द, मेंढा, वासेळा, कुर्झा परिसरात शेवटच्या टप्प्यात पाण्याअभावी धानाच्या पिकाला पाणी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातचे पिक गेले. जवळपास अर्ध्या पेक्षाही

गोसे (बु.) : या परिसरातील गोसे बुज गोसीखुर्द, मेंढा, वासेळा, कुर्झा परिसरात शेवटच्या टप्प्यात पाण्याअभावी धानाच्या पिकाला पाणी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातचे पिक गेले. जवळपास अर्ध्या पेक्षाही जास्त शेतकऱ्यांचे यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तरीही अर्ध्यापेक्षा जास्त नुकसान होवूनही या परिसराची नजरअंदाज आणेवारी ७० ते ७५ टक्केपर्यंत दाखविण्यात आली आहे.यावर्षी समाधानकारक पाऊस पडला नाही. सुरुवातीला एक महिना बिना पावसाचा गेला. एक महिन्यानंतर शेतकऱ्यांची पेरणी केली. पण धानाचे पीक अंतिम टप्प्यात असताना एका पावसाची अत्यंत गरज होती.ज्या शेतकऱ्यांच्या शेतीजवळ तलाव, नदी, नाले व इतर जलस्त्रोत होते त्यामधून धानाच्या पिकाला सिंचन करून आपले धानाचे पीक वाचविले. पण ज्या शेतकऱ्यांजवळ सिंचनाची सुविधा नव्हती त्या शेतकऱ्यांचे धानाचे उभे पिक डोळ्यासमोर वाळत होते. पण याला काहीही उपाय नसल्यामुळे ही पिकाची स्थिती पाहून अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. शेतात या धानाच्या पिकाचे रुपांतर तणसीत झाले होते. या परिसरातील अर्धे अधिक धानाचे पिक एक पावसाने गेले आहे. या शेतकऱ्यांनी सावकार, बचत गट, वित्तीय संस्था, बँक आदींकडून शेतीकरिता कर्ज काढले होते. पण या वर्षी त्यातील व्याजाचे पीक गेल्यामुळे हे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत शेतकरी सापडले आहेत. या शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना सरकारने आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)