चिखलदऱ्यातील पंचबोल पॉइंटवर गारपीट, जिल्ह्यात विजांचा कडकडाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 05:00 IST2021-03-19T05:00:00+5:302021-03-19T05:00:54+5:30

धारणी तालुक्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कासमार व खिडकी येथील चण्याचे उभे पीक जमीनदोस्त झाले. दोन्ही गावांत गारपीट झाली. चांदूर रेल्वे तालुक्यातील धानोरा म्हाली येथे बोराएवढी गार पडून भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. शहरातही अर्धा तास वादळी पाऊस कोसळला. काही घरांची टिनपत्रे उडाली. 

Hail at Panchbol point in Chikhaldarya, lightning in the district | चिखलदऱ्यातील पंचबोल पॉइंटवर गारपीट, जिल्ह्यात विजांचा कडकडाट

चिखलदऱ्यातील पंचबोल पॉइंटवर गारपीट, जिल्ह्यात विजांचा कडकडाट

ठळक मुद्देसोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळला पाऊस, भाजीपाला पिकांचे नुकसान, सवंगणी केलेल्या हरभरा, गव्हाच्या पेढ्या झाल्या ओल्या, वीजपुरवठा खंडित

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटनस्थळावर गुरुवारी दुपारी ४.३० वाजता अचानक अवकाळी पावसासह १० मिनिटांपर्यंत बोराच्या आकाराची गारपीट झाली. तालुक्यात काटकुंभ परिसरात तुरळक गारपीटसह पावसाने दमदार हजेरी लावली.
ढगाळ वातावरण असल्याने अवकाळी पावसाची शक्यता दोन दिवसांपासून वर्तविण्यात आली होती. गुरुवारी सायंकाळी ४ पासून तालुक्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. कवडाझिरी, काटकुंभ, कनेरी कोयलारी, गांगरखेडा, डोमा, बगदरी आदी परिसरातील गावांमध्ये तुरळक प्रमाणात गारपीट व पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतातील गहू व इतर पालेभाज्यांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

धारणी, चांदूर रेल्वेत गारांचा पाऊस
धारणी तालुक्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कासमार व खिडकी येथील चण्याचे उभे पीक जमीनदोस्त झाले. दोन्ही गावांत गारपीट झाली. चांदूर रेल्वे तालुक्यातील धानोरा म्हाली येथे बोराएवढी गार पडून भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. शहरातही अर्धा तास वादळी पाऊस कोसळला. काही घरांची टिनपत्रे उडाली. 

अवकाळीमुळे गारा वेचण्याची मौज
चिखलदरा पर्यटनस्थळावरील पंचबोल पॉईंटवर दहा मिनिटापर्यंत चांगलीच गारपीट झाली. त्यामुळे परिसरातील नाल्यांमध्ये गारांचा खच जमला होता. यात पर्यटकांनी गारपिटीचा आनंद लुटला. गार वेचण्याची मौजदेखील येथे आलेल्या कुटुंबांनी लुटली.  सायंकाळी वृत्त लिहिस्तोवर सेमाडोह परिसरात पावसाला सुरुवात झाल्याचे सांगण्यात आले.

अमरावती, बडनेरा शहरात तुरळक पाऊस
अमरावती, बडनेरा शहरात सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडला. दुपारपासूनच ढगाळ वातावरण होते. वेधशाळेनेसुद्धा पावसाची शक्यता वर्तविली होती. शहर, ग्रामीण भागात हलका पाऊस पडला. अजुर्नगर ते पंचवटी चौकात हलका पाऊस कोसळला. बाजार समितीत धान्य झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती. 

 

Web Title: Hail at Panchbol point in Chikhaldarya, lightning in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस