शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
2
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
3
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
4
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
5
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
6
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
7
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
8
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
9
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
10
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
11
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
12
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
13
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
14
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
15
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
16
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
17
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
18
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
19
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
20
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला दिशा देण्याचे काम गर्रा बघेडा करेल

By admin | Updated: November 18, 2014 22:49 IST

गावातील प्रयोगशिल शेतकऱ्यांनी शेतीमालाच्या मार्केटिंगचे जे तंत्र अवलंबिले ते जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांना जमले नाही हीच या गावाची शक्ती आहे. म्हणूनच संपूर्ण जिल्ह्याला दिशा देण्याचे काम गर्रा

पाहणी : सांसद आदर्श ग्राम योजनेची अंमलबजावणी, नाना पटोले यांचे प्रतिपादनभंडारा : गावातील प्रयोगशिल शेतकऱ्यांनी शेतीमालाच्या मार्केटिंगचे जे तंत्र अवलंबिले ते जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांना जमले नाही हीच या गावाची शक्ती आहे. म्हणूनच संपूर्ण जिल्ह्याला दिशा देण्याचे काम गर्रा बघेडा करु शकते. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्हा करण्याच्या माझ्या स्वप्नाला वास्तविकतेमध्ये आणण्यासाठी गावकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले.सांसद आदर्श ग्राम योजनेमध्ये निवडलेल् या गर्रा बघेडा या गावी नानाभाऊ पटोले यांनी गावात योजनेच्या अंमलबजावणीसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना खा.पटोले बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा वंदना वंजारी, आमदार चरण वाघमारे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रमेश पारधी, जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी, सरपंच वसंतराव तरटे व सर्व प्रशासकीय अधिकारी आदी उपस्थित होते.खा.पटोले म्हणाले, आदर्श गावाची सुरुवात गावाच्या एकोप्यापासून व्हायला पाहिजे. मतभेदाचे सर्व विचार बाजूला ठेवून गावातील जनता काम करण्यासाठी एकत्र येवू आणि गर्रा बघेडा हे महाराष्ट्रासाठी रोल लमॉडेल करू. गावात चकचकीत रस्ते किंवा समाज मंदिर असल्याने गावाचा विकास झाला असे होत नाही. गरीबांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना चांगले जीवनमान जगण्यासाठी वातावरण निर्मिती करणे हे आदर्श ग्राममध्ये अपेक्षित आहे. यासाठी गावातील सर्व लोकांचे सहकार्य अपेक्षित आहे.यावेळी आमदार चरण वाघमारे म्हणाले, आदर्श गावातील लोकांना श्रम करावे लागणार आहे. सगळ्या योजनांची अंमलबजावणी गावात करून घेण्यासाठी गावातीलच लोकांनाच पुढाकार घेवून प्रयत्न करावयाचा आहे. तुमच्या प्रयत्नांनी हे गाव महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील आदर्श ग्राम होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे म्हणाल्या, लोकसहभागातूनच आदर्श ग्राम योजनेची अंमलबजावणी यशस्वी होईल. गावातील आर्थिक व सामाजिक दृष्ट्या उपेक्षित राहिलेल्या लोकांपर्यंत गावातील संसाधने पोहचविण्याची जबाबदारी गावकऱ्यांची आहे. गावात एकही गुन्हा घडणार नाही. महिला सभा, बाल सभा, ग्राम सभा वेळेत घेतल्या जाऊन त्यामध्ये गावाच्या हिताचे नियोजन गावकऱ्यांनी करावयाचे आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी म्हणाले, सांसद आदर्श ग्राम योजनेसाठी जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि प्रशासकीय विभागाचे संपूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.यावेळी सरपंच वसंतराव तरटे यांनी प्रास्ताविकामध्ये गावाचा लेखाजोखा मांडताना गावातील समस्या सुद्धा विशद केल्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष वंदना वंजारी, उपाध्यक्ष रमेश पारधी, जिल्हा परिषद सदस्य हरेंद्र राहांगडाले, सुरेश राहांगडाले, तुमसरचे पचायत समितीचे सभापती कलाम शेख यांची समयोचित भाषणे झाली. गावात प्रवेश करताच मान्यवरांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि गावातील नागरिक, महिला, विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)