शहरं
Join us  
Trending Stories
1
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
2
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
3
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
4
टीम इंडिया ९३ धावांवर 'ऑलआउट', दुसरीकडे करुण नायरने एकट्याने केल्या त्यापेक्षा जास्त धावा
5
पुण्यातील या नगर परिषदेत ठाकरे आणि शिंदे गट एकत्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा
6
पाक विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघासाठी कसे असेल Asia Cup स्पर्धेतील सेमीच समीकरण?
7
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
8
भ्रष्टाचाराचं Live प्रेझेंटेशन... तरुणाचा महापौरांसमोरच कॉल, अधिकाऱ्यांच्या 'रेट लिस्ट'चा पर्दाफाश
9
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
10
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
11
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
12
Stock Market: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; सेन्सेक्समध्ये १०० अंकांची तेजी, निफ्टी २५,९०० च्या वर
13
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
14
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
15
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
16
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
17
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
18
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
19
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
20
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी उत्पादक कंपन्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 01:18 IST

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण बँक नाबार्ड अर्थसहायक निधीतून गत तीन वर्षापासून शेतकरी उत्पादक कंपन्या विविध ठिकाणी कार्यरत आहेत. याअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी गणेशपूर येथे गुरूवार १३ जून रोजी पार पडलेल्या मार्गदर्शनपर खरीप सभेत विविध विषयांवर उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांनी मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती : कृषी विभाग व आत्माचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण बँक नाबार्ड अर्थसहायक निधीतून गत तीन वर्षापासून शेतकरी उत्पादक कंपन्या विविध ठिकाणी कार्यरत आहेत. याअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी गणेशपूर येथे गुरूवार १३ जून रोजी पार पडलेल्या मार्गदर्शनपर खरीप सभेत विविध विषयांवर उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांनी मार्गदर्शन केले. शेतीपूरक व्यवसायासोबतच शेतमाल साठवणूक गोदामात माल ठेवल्यानंतर शेतकऱ्यांना होणाऱ्या फायद्याचीही यावेही तज्ज्ञांकडून माहिती देण्यात आली.भंडारा तालुक्यातील गणेशपूर प्रोडूसर कंपनीची सभा गणेशपूर येथे आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये लाड यांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामाचा आढावा, पिकनिहाय लागवड, शेतकरी उत्पादक कंपनीसाठी असणारी आवाहने आणि त्यावरील उपाययोजनांची विस्तृत माहिती दिली. जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकºयांनी गटशेती व शेतकरी उत्पादक कंपन्यांशी आपली भागीदारी वाढविल्यास शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होईल. तसेच शेतकरी गटांच्या सभासदांना व इतरही शासकीय योजनांसाठी मदत केली जाईल, असे सांगितले.त्यानंतर पुढे बोलताना आत्माचे बी.टी.एम. सतीश वैरागडे यांनी शेतकऱ्यांनी आपला शेतमाल कवडीमोल भावात विक्री न करता कंपनीकडे असणाºया गोदामात धान्य ठेवल्यास मालाच्या ७० टक्के किंमत शेतकºयांना मिळू शकेल व शासनाच्या सबसीडीचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर चिखलीचे प्रगतशील शेतकरी तानाजी गायधने यांनी भाजीपाला उत्पादन आणि विक्रीसंदर्भात विस्तृत मार्गदर्शन करून तालुका स्तरावर शेतकºयांच्या गटनिमिर्ती विषयी मार्गदर्शन केले.शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये शेतकऱ्यांचे अमूल्य योगदान असून शेतकरी उत्पादक कंपनी गणेशपूर ही शेतकºयांसाठी कंपनीचे सभासद होवून एकत्र येत शेतकरी बांधवांना प्रगतीसाठी आवाहन केले.यावेळी अनेक शेतकºयांनी भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी आल्यापासून कृषी विभागाशी शेतकºयांचा असलेला सहभाग वाढवल्याचेही मनोगतात सांगितले. शेतकरी उत्पादक कंपनीच्या खरीप सभेसाठी भंडाराचे उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड आत्माचे बीटीएम सतीश वैरागडे, संजय एकापुरे, प्रगतशील शेतकरी तानाजी गायधने, अनिल नौकरकर, निलेश गाढवे, देवानंद चौधरी, पवन कटणकर, हरेंद्र रहांगडाले, वापकोचे अधिकारी पंकज गिरडे आदी मान्यवर उपस्थित होते.शेतकऱ्यांनी सहभागी व्हावेगटशेती आणि शेतकरी उत्पादक संस्थेत शेतकºयांची संख्या वाढल्यास शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. समूह वाढल्याने शेतकऱ्यांचाच अधिक फायदा होतो. त्यासाठीच शेतकऱ्यांनी गटशेती आणि शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी मिलिंद लाड यांनी केले.

टॅग्स :Farmerशेतकरी