जीएसटी करार सामान्यांसाठी जीवघेणा

By Admin | Updated: June 16, 2017 00:18 IST2017-06-16T00:18:33+5:302017-06-16T00:18:33+5:30

राज्य आणि केंद्र सरकारच्या जीएसटी करार सामान्यांसाठी जीवघेणा ठरणार आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते

GST contracts to be fatal for the common man | जीएसटी करार सामान्यांसाठी जीवघेणा

जीएसटी करार सामान्यांसाठी जीवघेणा

सुनील फुंडे : राष्ट्रवादी काँग्रेसचा तहसील कार्यालयावर मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : राज्य आणि केंद्र सरकारच्या जीएसटी करार सामान्यांसाठी जीवघेणा ठरणार आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते तथा मध्ळवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी केले.
राज्य सरकारच्या शेतकरी आणि सामान्य जनतेच्या विरोधी धोरणामुळे होणाऱ्या असंतोष व्यक्त करण्यासाठी आज लाखनी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे मेळावा तसेच लाखनी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळई आयोजित सभेत ते बोलत होते.
सुनील फुंडे म्हणाले, घरकुल, दुधउत्पादन, शेतकरी कर्ज, वृद्ध पेन्शन लाभ, आजही शेतकऱ्यांना त्रास होत आहे. जिल्ह्यात ३०५ कोटी रुपयांची शेतकऱ्यांना कजार्ची गरज असते परंतु शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. रिझर्व्ह बँकेद्वारे २ कोटी रुपयांची रक्कम येत असल्यामुळे एटीएम च्या समस्ये मध्ये वाढ होत आहे. शासनाने सरसकट कर्जमाफी केली असली तरीही १० हजार रुपयांची तरतूद झाली नाही. आज शासनाने भीतीपोटी कर्जमाफी केली परंतु थकीत कर्जदारांना कर्जमाफी आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर या शासनाने अन्याय केला त्यामुळे शेतकऱ्यांंनी या समस्येविरुद्ध रस्त्यावर उतरून जण आंदोलन करणे आवश्यक झाले आहे.
युवक कार्यकर्त्यांनी समजतील अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी झटावे. जनसंपर्क वाढवावा आणि जनसामान्यांत आपली राष्ट्रवादी प्रतिमा उंचवावी असे आवाहन प्रदेश महासचिव राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय दलाल यांनी केले. संगठन मजबूत करण्यासाठी योग्य ते प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष माजी आमदार मधुकर कुकडे यांनी केले.
गाव तिथे राष्ट्रवादी आणि घर तिथे कार्यकर्ता असे आपल्या कुशल शैलीतून अभिषेक कारेमोरे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे लाखनी शहरात आजपर्यत नगरपंचायत, लाखनी येथे घरकुल योजना कार्यान्वित करण्यात आलेली नाही या पार्श्वभूमीवर लाखनी येथे धनंजय दलाल, सुनील फुंडे, मधुकर कुकडे, अभिषेक कारेमोरे, स्वप्नील नशीने, डॉ रवींद्र वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली लाखनी तहसील कार्यालय येथे मार्च काढण्यात आला.
यावेळी डॉ विकास गभणे, अशोक चोले, नगरपंचायत उपाध्यक्ष धनु व्यास, नगरसेविका दीपाली जांभुळकर, बाळा शिवणकर, गुणवंत दिघोरे, दिनेश निर्वाण, उर्मिला आगाशे, प्रशांत चचाने आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन युवक तालुकाध्यक्ष गुणवंत दिघोरे व आभार शहराध्यक्ष दिनेश निर्वाण यांनी मानले.

Web Title: GST contracts to be fatal for the common man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.