थकबाकीमुळे ग्रामपंचायत अडचणीत
By Admin | Updated: September 16, 2014 23:31 IST2014-09-16T23:31:46+5:302014-09-16T23:31:46+5:30
करडी ग्रामपंचायत थकीत करधारकांमुळे आर्थिक संकटात सापडली आहे. ग्रामपंचायतीचे विविध खर्च भागविण्यासाठी पेच निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीची एकूण मागणी ९,८१,९९० रुपये असताना सप्टेंबरपर्यंत

थकबाकीमुळे ग्रामपंचायत अडचणीत
युवराज गोमासे - करडी (पालोरा)
करडी ग्रामपंचायत थकीत करधारकांमुळे आर्थिक संकटात सापडली आहे. ग्रामपंचायतीचे विविध खर्च भागविण्यासाठी पेच निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीची एकूण मागणी ९,८१,९९० रुपये असताना सप्टेंबरपर्यंत फक्त ७६,५३० रुपयांची कराची वसुली झाली आहे. खर्च वजा जाता ग्रामपंचायतीकडे पैसेच शिल्लक नाहीत. दिवाळी समोर असताना वीज बिल, कर्मचारी वेतन, दैनंदिन खर्च, इतर देणे आदी खर्चासाठी अडचणी आहेत. आर्थिक डबघाईच्या मार्गावर असलेल्या ग्रामपंचायतीने वसुलीसाठी कठोर निर्णय घेण्याची गरज आहे.
करडी हे परिसरातील सर्वात मोठे गाव आहे. गावाची लोकसंख्या सहा हजाराचे घरात असून मध्यवर्ती व्यापाराचे केंद्र म्हणूनही मोहाडी तालुक्यात गावाची ओळख आहे. व्यापारी प्रतिष्ठान असलेल्या गावाची ग्रामपंचायत सध्या मात्र आर्थिक तंगीत सापडली असून विविध कठीनाईचा सामना करीत आहे. नागरिकांवर मोठ्या प्रमाणात करांची रक्कम थकीत आहे. मागील थकबाकी, चालू मागणी आणि झालेली वसुली यात कमालीची तफावत आहे. एकूण कर मागणीच्या ७ टक्के रक्कम कराच्या कपात गोळा झाली तर ९३ टक्के रक्कम थकीत आहे. ग्रामपंचायतीचे उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून कर रुपाने जमा होणाऱ्या निधीकडे पाहिले जाते. मात्र हे स्त्रोतच आटल्याने ग्रामपंचायतीवर देणदारांची रक्कम थकीत झाली आहे.
दिवाळीचा सण समोर असतांना गावात पथदिवे व साफसफाई, पाण्यात ब्लिचींग पावडर, विज बिल, कर्मचाऱ्यांचे वेतन, दैनंदिन प्रशासकिय खर्चासाठी प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
करडी ग्रामपंचायतीची सन २०१४-१५ या आर्थिक वर्षातील विविध करांची थकीत व चालू मागणी रक्कम याप्रमाणे आहे. ग्रामपंचायतीची सामान्य कर व पाणी कर मिळून सर्व मार्गाची एकूण कर मागणी ९,८१,९९० रुपयांची आहे. ग्रामपंचायतीला एकुण कर मागणीच्या रक्कमेपैकी वसुली सामान्य कर ५०,६०५ रुपये, सर्व पाणी करांची वसुली २५,९२५ रुपये, एकुण ७६,५३० रुपयांची वसुली सप्टेंबर २०१४ पर्यंत झाली आहे. ग्रामपंचायतीला एकुण कर मागणीच्या ७ टक्के रक्कमेची वसुली प्राप्त झाली आहे. एकुण कर वसुलीमध्ये १३ ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या रक्कमेचा सर्वाधिक वाटा आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रामपंचायतीला कर वसुलीसाठी सक्तीची व जप्तीची कारवाई करण्याशिवाय तरणोपाय दिसत नाही.