गरिबांच्या उत्थानासाठी शासकीय योजना
By Admin | Updated: April 2, 2015 00:57 IST2015-04-02T00:57:06+5:302015-04-02T00:57:06+5:30
सध्याचे युग हे परिश्रमाचे व स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेच्या युगात मानसाने देशाच्या भरभराटीच्या उद्देशाने कार्य केले पाहिजे.

गरिबांच्या उत्थानासाठी शासकीय योजना
मोहाडी : सध्याचे युग हे परिश्रमाचे व स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेच्या युगात मानसाने देशाच्या भरभराटीच्या उद्देशाने कार्य केले पाहिजे. जेव्हा मनुष्य मोठा होतो, तेव्हा त्यावेळी आपण मागे वळून पाहिले पाहिजे. भारत सरकारच्या पडोस युवा संसद कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला फार चांगले संधी लाभली आहे. या माध्यमातून समाजकारणाची व त्याबरोबर देशाच्या सेवेची संधी प्राप्त होईल. आज समाजाच्या हिताच्या दृष्टीने कार्य शासन करत आहे. गरीबांच्या उत्थानासाठी योजना राबविल्या आहेत, असे मत नेहरू युवा केंद्राचे रमेश अहिरकर यांनी व्यक्त केले.
नेहरू युवा केंद्र भंडारा व नेहरू युवा मंडळ मोहाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पडोस युवा संसद कार्यक्रमात ते बोलत होते.
उद्घाटन स्वामी विवेकानंद यांच्या छायाचित्राचे माल्यार्पण करून दिप प्रज्वलीत करण्यात आले. त्याप्रसंगी रमेश अहीरकर, नरेंद्र निमकर, अशोक हलमारे, यशवंत थोटे, राहुल डोंगरे, वैशाली सतदेवे, वैशाली गांगुर्डे, दिव्या माटे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात प्रधानमंत्री जनधन योजना, स्वच्छ भारत अभियान, निर्मल भारत अभियान, संसद आदर्श योजना मे भागिदारी, सुशासन को बढावा देणा और उसका अभ्यास श्रमदान के साथ ही शिक्षा, स्वास्थ्य परिवार कल्याण और पोषण पर्यावरण संरक्षण, महिला सशक्तीकरण, सुशासन व नागरिक शिक्षा और सामाजिक मुद्दे या विषयावर मान्यवरांच्या हस्ते मार्गदर्शन करण्यात आले.
प्रास्ताविक नेहरू युवा मंडळाचे सदस्य प्रशांत गायधने यांनी केले. संचालन सपना वैद्य व दिपाली मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन महान निमजे यांनी केले.
कर्यक्रमाला तालुक्यातील युवा मंडळाचे अध्यक्ष व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मंडळाचे सदस्य महेंद्र धकाते, सौरभ जाधव, निलेश सोनकुसरे, शुभम पारधी, राधेश्याम डेकाटे, सौरभ पातरे, वामन डेकाटे, भुमेश्वर श्रीपाद व अन्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)