शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प झाला ३० वर्षांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 10:58 PM

पूर्व विदर्भासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेला गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प २२ एप्रिल रोजी आपला ३० वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. हा राष्ट्रीय प्रकल्प ऐन तारुण्यात आहे. प्रकल्पाची किंमत प्रकाशाच्या वेगाने वाढली. परंतु सिंचन क्षमता वाढविण्यात प्रशासनाला यश मिळू शकले नाही.

ठळक मुद्देनिधीअभावी कामे प्रलंबित : १५ टक्केपेक्षा अधिक सिंचन होवू शकले नाही

अशोक पारधी ।लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : पूर्व विदर्भासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेला गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प २२ एप्रिल रोजी आपला ३० वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. हा राष्ट्रीय प्रकल्प ऐन तारुण्यात आहे. प्रकल्पाची किंमत प्रकाशाच्या वेगाने वाढली. परंतु सिंचन क्षमता वाढविण्यात प्रशासनाला यश मिळू शकले नाही.१९८३ ला प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता ३७२ कोटी रुपयांची होती. ३० वर्षानंतर प्रकल्पाची सुधारित प्रशासकीय मान्यता किंमत १८,४९४ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. साधारणत: चार हजार नऊशे पट किमतीत वाढ झाली असली तरी सिंचन मात्र १५ टक्के पेक्षा अधिक होवू शकले नाही.गोसेखुर्द प्रकल्पाला सन २००९ मध्ये राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे केंद्र शासनाचा निधी प्राप्त होत असल्याने गोसेखुर्द प्रकल्पाचे कामास गती मिळालेली आहे. मुख्य धरणाचे काम १०० टक्के पूर्ण झालेले असून धरणातील पाणी साठवण क्षमता ११४६ दलघमी आहे. तलांक २४२.५० मी पर्यंत पाणीसाठा करण्यात येत आहे. शासकीय आकडेवारीनुसार उजव्या मुख्य कालव्याचे काम ९८ टक्के पूर्ण झालेले आहे. शाखा कालवे ५० टक्के पूर्ण झालेले आहेत.निर्मित सिंचन क्षमता १३,९२६ हेक्टर असली तरी प्रत्यक्ष वापर ७,२१० हेक्टर एवढेच आहे. उजवा मुख्य कालवा ३० कि.मी. अंतरापर्यंत पूर्ण झालेला असून त्यामुळे सेध असल्याने ३० कि.मी. पर्यंतचा क्षेत्रात हरित पट्टा निर्माण झाला आहे. उन्हाळी भात व काही क्षेत्रात ऊसाची लागवड करण्यात आलेली आहे. पवनी, कोदुर्ली, रेवणी, धानोरी, भोजापूर, गुडेगाव, खातखेडा, सावरला गावालगतच्या लाभक्षेत्रात शेतकरी, शेतमजुरांना रोजगार उपलब्ध झालेला आहे.डावा मुख्य कालवा पूर्ण झालेला असला तरी मुख्य कालव्याचे अस्तरीकरणाचे कामात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले. प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले. आता पूर्ण अस्तरीकरणाचे काम सुरु करण्यात आलेले आहे. खरीप हंगामात ११ हजार हेक्टर क्षेत्रात सिंचन करण्यात आल्याचे शासकीय आकडे सांगत आहेत. मात्र रब्बी हंगामात डावा मुख्य कालवा कोरडा ठेवण्यात आलेला आहे. उजवा मुख्य कालवा आसोला मेंढा जलाशयापर्यंत पोहचला. त्यामुळे जलाशयात पाणी पाठविण्याचा प्रायोगिक प्रयत्न करण्यात आलेला आहे. प्रत्यक्ष सिंचन क्षमता वाढविण्यासाठी आसोला मेंढा जलाशय मुख्य कालवा व वितरण प्रणालीच्या कामाचे नूतनीकरण करण्यात येत आहे.प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा देण्यात आलेला असला तरी २०१३-१४ पासून प्रकल्पाला केंद्राकडून निधी देण्यात आलेला नाही. त्यामुळे कित्येक कामे निधीअभावी प्रलंबित आहेत. यापुढे एनबीसीसी (नॅशनल बिल्डींग कन्स्ट्रक्शन कार्पोरेशन) मार्फत प्रकल्पाचे उर्वरित काम करण्यात येणार आहे. दर्जेदार पुनर्वसन, उजवा मुख्य कालवा, नेरला उपसा सिंचन योजना, मोखाबर्डी उपसा सिंचन योजना व नवीन प्रस्तावित उपसा सिंचन योजना ही सर्व कामे एनबीसीसी मार्फत करण्याचा करार करण्यात आलेला आहे.उपसा सिंचन योजनागोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पावर आधारित टेकेपार उपसा सिंचन योजना कार्यान्वित झालेली असून प्रत्यक्ष पाणी वापर ५,५१४ हेक्टर क्षेत्रात करण्यात येत आहे. आंभोरा उपसा सिंचन योजना कार्यान्वित झालेली असून प्रत्यक्ष पाणी वापर ४,२५८ हेक्टर क्षेत्रात करण्यात येत आहे. नेरला उपसा सिंचन योजना आॅगस्ट २०१६ ला कार्यान्वित करण्यात आली. परंतु खरीप हंगामात ४,२३२ हेक्टर क्षेत्रात पाणी वापर झालेला आहे. रब्बी हंगामात शेतीला पाणी मिळू शकले नाही. मोखाबर्डी उपसा सिंचन योजना एप्रिल २०१८ अखेर कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे समजते. शिवनाळा, आकोट, पवनी, शेळी व गोसी उपसा सिंचन योजना शासनदरबारी प्रलंबित आहेत.पुनर्वसन व स्थलांतरप्रथम टप्प्यातील १८ गावापैकी १८ गावे, दुसऱ्या टप्प्यातील ४० पैकी १७ गावे, तिसºया टप्प्यातील २७ गावापैकी ६ गावे स्थलांतरीत झालेले आहेत. एकुण ८५ गावठाणापैकी ४१ गावठाणे पूर्णपणे स्थलांतरीत झालेली आहेत. ४४ गावाच्या पुनर्वसन व स्थलांतरणाचा प्रश्न अद्याप कायम आहे. पवनी तालुक्यातील खापरी (रेहपाडे) गावासाठी अद्याप गावठाण उपलब्ध करून देण्यात आलेले नाही व स्वेच्छा पुनर्वसनाला हिरवी झेंडी देण्यात आलेली नाही.