शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत शिरून विद्यार्थ्याला मारहाण

By admin | Updated: February 10, 2016 00:32 IST

शाळेत विद्यार्थ्याने केलेल्या क्षुल्लक भांडणामुळे राग अनावर झालेल्या एका इसमाने शाळेत शिरून चक्क विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

विद्यार्थ्यांची सुरक्षा ऐरणीवर : पाहुणगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील प्रकारविरली (बु.) : शाळेत विद्यार्थ्याने केलेल्या क्षुल्लक भांडणामुळे राग अनावर झालेल्या एका इसमाने शाळेत शिरून चक्क विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना लाखांदूर तालुक्यातील पाहुणगाव येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत आज मंगळवारला दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थ्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून या विद्यार्थ्यांचा वाली कोण, असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.या घटनेतील पीडित विद्यार्थ्याचे नाव निखील रामदास राऊत असे असून तो चौथ्या वर्गाचा विद्यार्थी आहे. वर्गात बसले असताना त्याला निशा वाघमारे या विद्यार्थिनीने पेन्सील टोचली. त्यामुळे निखीलने निशाला मारले. निशाने शाळेतून घरी जावून आपल्या वडिलांना निखिलने मारल्याची तक्रार केली. वडील मंगेश वाघमारे यांचा राग अनावर झाला. त्यांनी तातडीने शाळा गाठून वर्गात बसलेल्या निखीलला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याची चाहूल समोर वर्गात अध्यापन करीत असलेल्या सहायक शिक्षक आर.एस. कापसे यांना लागली. त्यांनी आपल्या परीने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत त्यांचे इतर सहकारी शिक्षक धावले. त्यामुळे मंगेशने अखेर शाळेतून पळ काढला. घटनेची माहिती गावात पसरताच सरपंच देवीदास राऊत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष कोरे, पोलीस पाटील छत्रपती नाकतोडे आणि गावकरी मोठ्या संख्येने शाळेत गोळा झाले. या घटनेमुळे येथील शिक्षकांविषयी गावकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.या शाळेत १ ते ७ वर्ग असून ६ शिक्षक कार्यरत आहेत. घटनेच्या दिवशी मुख्याध्यापक एस.एस. इखार आणि शिक्षक पी.एल. घरत हे शाळाभेटीसाठी कढाली (जि.चंद्रपूर) येथे गेले होते. सहायक शिक्षिका एन.आर. ब्राम्हणकर या रजेवर होत्या. त्यामुळे केवळ तीन शिक्षकांवर ७ वर्ग सांभाळण्याची वेळ आली. घटनेच्या वेळी चौथ्या वर्गावर शिक्षक उपस्थित नव्हते. त्यामुळे सदर इसमाने संधी साधून विद्यार्थ्याला मारहाण केल्याचे दिसून येते. या शाळेतील शिक्षक शाळेत वेळेवर हजर राहत नाहीत. त्यामुळे बरेचदा येथील विद्यार्थी वाऱ्यावर असतात, असा संतप्त गावकऱ्यांचा आरोप आहे. शाळा सुरु असताना वाघमारे याने त्या विद्यार्थ्याला मारहाण केली कशी?, त्यावेळी शिक्षक काय करीत होते, असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. (वार्ताहर)घटनेच्या वेळी आम्ही केवळ तीन शिक्षक शाळेत उपस्थित होतो. त्यामुळे आम्हाला सात वर्ग सांभाळताना या वर्गात थोडा वेळ, दुसऱ्या वर्गात थोड ावेळ देणे भाग होते. चौथ्या वर्गात शिक्षकांच्या अनुपस्थितीचा गैरफायदा वाघमारे यांनी घेतला. यात आम्हा शिक्षकांचा काहीच दोष नाही.-आर.एस. कापसेसहायक शिक्षक, जि.प. प्राथ. शाळा, पाहुणगाव