शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर टाकला कचरा

By admin | Updated: March 5, 2016 00:33 IST

घनकचरा व्यवस्थापनेचे धिंडवडे निघाले असताना त्यात आजच्या नगरसेवकाच्या कृतीने पुन्हा एकदा या बाबीतला रोष समोर आला.

नगरपालिकेतील प्रकार : घनकचरा व्यवस्थापन फज्जेचा रोष, नगरसेवकाचा प्रतापभंडारा : घनकचरा व्यवस्थापनेचे धिंडवडे निघाले असताना त्यात आजच्या नगरसेवकाच्या कृतीने पुन्हा एकदा या बाबीतला रोष समोर आला. भाजपचे नगरसेवक महेंद्र निंबार्ते यांनी आज गुरूवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास नगरपालिकेतील मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर घरातील कचरा आणून टाकला. अचानकपणे घडलेल्या प्रकारामुळे कर्मचारी व अन्य कामांसाठी आलेल्या नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.वारंवार सांगुनही घनकचरा व्यवस्थापनेकडे दुर्लक्ष केल्याने नगर पालिका प्रशासनाचा निषेध व ध्यानाकर्षण करण्यासाठी हा प्रकार केल्याचे स्पष्ट झाले.साफसफाई, जिथे स्वच्छता तिथेच लक्ष्मी नांदते, असे म्हटले जाते. पण भंडारा शहर मात्र त्यासाठी अपवाद ठरत आहे. शहर स्वच्छ आणि सुंदर दिसण्याऐवजी चक्क रस्त्या-रस्त्यांवर साचलेल्या कचऱ्यात भंडारा शहर हरवून गेले की काय? असे वाटत आहे. मागील महिन्यात शहराच्या मुख्य मागाचे डांबरीकरण करण्यात आले असले तरी रस्त्याच्या कडेला कचराच कचरा दिसून येतो. हे दृश्य शहराच्या विद्रुपतेत भर घालत आहे. अस्वच्छता आणि तुंबलेल्या नाल्यांसाठी प्रसिद्ध असल्याचे जाणवते. सामाजिक संघटनांच्या माध्यामातून शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करण्यात येत असला तरी नागरिकांचे सहकार्य अत्यल्प आहे. स्वच्छता केली तर दुसऱ्या दिवशी स्वच्छ केलेला परिसर पुन्हा कचऱ्याने माखू लागतो. रस्त्यांवर कचराच कचरा दिसून येतो. जिल्हाधिकारी चौकापासून ते शास्त्रीनगर चौकापर्यंत आणि महात्मा गांधी चौकापासून तर जिल्हा परिषद चौकापर्यंतच्या रस्त्यांवर कचरा हमखास दिसून येते.दरम्यान घनकचरा व्यवस्थापनेच्या बाबीला हेरून नगरसेवक महेंद्र निंबार्ते यांनी आज नगरपालिकेत मुख्याकिाऱ्यांच्या दालनासमोरच घरातील कचरा आणून फेकला. कचऱ्यामुळे संपूर्ण हॉलमध्ये दुर्गंधी पसरली. नगर पालिकेचा स्वच्छता विभाग घनकचरा व्यवस्थापनेकडे गांर्भियाने लक्ष देत नाही, असा आरोप करित निंबार्ते यांनी नगर पालिकेच्या कार्यप्रणालीवर आक्षेप घेतला. गुणवत्तेचा प्रश्न विचारात न घेतलेला बरा. त्यातही नालीच्या समस्याने घनकचरा व्यवस्थापनेचे तिनतेरा वाजले आहेत. (प्रतिनिधी)