दुष्काळाच्या घोषणेवरून जिल्ह्यातील शेतकऱ्यांत रोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:38 IST2018-11-02T00:38:19+5:302018-11-02T00:38:50+5:30
शासनाने घोषीत केलेल्या दुष्काळी तालुक्यात जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नसल्याने शेतकºयात प्रचंड रोष दिसत आहे. धानपीकाची स्थिती दुष्काळी असताना शासनाने जिल्ह्याला का वगळले असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दुष्काळाच्या घोषणेवरून जिल्ह्यातील शेतकऱ्यांत रोष
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शासनाने घोषीत केलेल्या दुष्काळी तालुक्यात जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नसल्याने शेतकºयात प्रचंड रोष दिसत आहे. धानपीकाची स्थिती दुष्काळी असताना शासनाने जिल्ह्याला का वगळले असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यशासनाने १५१ तालुक्यांमध्ये गंभीर व मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला. त्यात भंडारा जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नाही. खरे पाहता भंडारा जिल्हा हा गत काही वर्षांपासून दुष्काळाचा सामना करीत आहे. यावर्षीही दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अपुºया पावसाने धानपीक हातचे गेले आहे. शासनाने सुरुवातीला दुष्काळसदृष्य तालुक्याच्या यादीत जिल्ह्यातील मोहाडी, लाखनी आणि पवनी या तीन तालुक्यांचा समावेश केला होता. संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करा अशी मागणी होती. त्यामुळे ३१ आॅक्टोबर रोजी होणाºया निर्णयाकडे जिल्ह्यातील सर्व शेतकºयांचे लक्ष लागले होते. परंतु यादीची घोषणा झाल्यानंतर जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नसल्याचे पाहून शेतकºयांचा भ्रमनिरास झाला.
भंडारा हा जिल्हा प्रमुख भात उत्पादक जिल्हा आहे. या पीकाला पाण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. परंतु यंदा सरासरीच्या ७७ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला. पाण्याची आवश्यकता असताना पाऊस च आला नाही. परिणामी शेकडो हेक्टवरील धानपीक करपले. शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषीत केले जाईल अशी अपेक्षा होती.
परंतु आता यादीत एकाही तालुक्याचा समावेश नसल्याने शेतकरी शासनाच्या विविध मदतीपासून वंचित राहणार आहे. शासनाने दुष्काळ घोषीत करण्याच्या यादीबाबत फेरविचार करून जिल्ह्यातील सर्व सातही तालुक्यांचा समावेश करावा अशी मागणी आहे.
दुष्काळाची गरज असताना शासनाने शेतकºयांची क्रूर थट्टा चालविली आहे. यातून धान उत्पादक शेतकरी आत्महत्येच्या वाटेवर जातील. शेतीपूरक दूध व्यवसायीकांचेही हाल आहेत. २० रुपये लिटर पाणी आणि १९ रुपये लिटर दूध अशी अवस्था आहे. शासनाने गांभीर्याने विचार केला नाही तर जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.
-सुनील फुंडे, अध्यक्ष भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.
शासनाने घोषीत केलेली दुष्काळग्रस्तांची यादी म्हणजे शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार होय. जिल्ह्यात धानशेतीची गंभीर अवस्था असताना दुष्काळ घोषीत झाला नाही. सत्ताधारी पक्षाचे जिल्ह्यात तीनही आमदार असताना तेही गप्प आहेत.
-नरेंद्र भोंडेकर, माजी आमदार.