शहरं
Join us  
Trending Stories
1
चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी दिली भाजपाच्या मुख्यालयाला भेट, ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा
2
America Iran Tariff: अमेरिकेचा इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांना इशारा, २५ टक्के अतिरिक्त टॅरिफची घोषणा; भारतावर होणार 'हा' परिणाम
3
सैराट! प्रेमाला विरोध, पोटच्या लेकीचं कुंकू पुसलं; घरात घुसून जावयावर झाडल्या गोळ्या, परिसर हादरला
4
कल्याणमध्ये २१ वर्षीय एअर होस्टेसचा प्रियकराकडून छळ; ६ वर्षांच्या प्रेमाचा असा झाला भीषण शेवट, आरोपी अजूनही मोकाट?
5
"मुस्तफिजूर रहमानशी माझा काय संबंध?"; IPL 2026 वरच्या प्रश्नावर मोहम्मद नबी संतापला...
6
११ वर्षांनी अद्भूत योगात मकरसंक्रांती २०२६: संक्रमण पुण्य काल कधी? पाहा, महत्त्व-मान्यता
7
मकर संक्रांती २०२६: यंदा संक्रांतीला काळे कपडे घालणार? थांबा! 'या' ३ चुका केल्यास होऊ शकतो उलट परिणाम! 
8
आईच्या पिंडदानाची तयारी सुरू होती, तेवढ्यात फोन खणखणला अन्...; असं काही घडलं की सगळेच झाले हैराण!
9
कोट्यवधींच्या रॉल्स रॉयसच्या दरात मोठी सवलत? किमतीत ४० टक्क्यांपर्यंत घटीची शक्यता
10
Wife सोबत मिळून पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये करा गुंतवणूक; महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
11
“राष्ट्रभक्तीचा नवा अध्याय, सत्तेसाठी भाजप+एमआयएम अकोट पॅटर्न”; ठाकरे गटाच्या नेत्यांची टीका
12
तुमच्यावर कोणी करणी केलीय का? घरावर बाहेरची शक्ती कार्य करतेय का? कसे ओळखाल? ४ संकेत मिळतात
13
इराणच्या खामेनी विरोधात बंड पुकारणं पडणार महागात! 'या' २६ वर्षीय तरुणाला दिली जाणार फाशी?
14
Makar Sankranti 2026: संक्रांतीला विशेषतः स्त्रियांनी 'या' गोष्टींचे करावे दान; होतो दुप्पट लाभ आणि कुटुंबाची प्रगती 
15
टॅरिफविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला तर अमेरिका संपली...; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी भीती
16
चांदीची ऐतिहासिक भरारी! २.६८ लाखांचा टप्पा पार; आता ३ लाखांचे लक्ष्य? खरेदीची संधी की नफावसुलीची वेळ?
17
२०२६ची पहिली षट्तिला एकादशी: अनंत कृपा लाभेल, काही कमी पडणार नाही; ‘असे’ करा व्रत पूजन!
18
अमेरिकेने व्हेनेझुएलावर अज्ञात शस्त्र वापरले, मादुरोंचा गार्ड म्हणाला, "नाक-तोंडातून रक्त येत होतं आणि..."
19
IMPS द्वारे पैसे पाठवणं महागणार; 'या' दिग्गज सरकारी बँकेनं कोट्यवधी ग्राहकांना दिला मोठा झटका
20
PNB मध्ये जमा करा ₹२,००,०००, मिळेल ₹८१,५६८ चं फिक्स व्याज; जाणून घ्या संपूर्ण स्कीम
Daily Top 2Weekly Top 5

भंडाऱ्यातील रस्त्यांसाठी १० कोटींचा निधी मंजूर, बांधकाम मात्र अर्धवट ! दोन वर्षांपासून नागरिकांचे होताहेत हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 17:12 IST

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : वाहनचालक हैराण, खडकी-ढिवरवाडा अर्धवट रस्त्याचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा मुख्यालयाला जोडणाऱ्या भंडारा ते खडकी मार्गावरील खडकी ते ढिवरवाडा दरम्यानच्या मातीमोल झालेल्या रस्त्याच्या बांधकामासाठी दोन वर्षापूर्वी माजी सरपंच धामदेव वनवे यांनी नागरिकांच्या मदतीने दोनदा रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी आमदार राजू कारेमोरे यांच्या मध्यस्थीने शासनाने १० कोटींचा निधी मंजूर केला. मात्र, मोहाडी राज्य बांधकाम विभागाने या रस्त्याचे कंत्राट भंडारा उपविभागाकडून हिसकावून घेतले. दीड वर्षापूर्वी रस्त्याचे बांधकाम संथगतीने सुरू झाले. अद्यापही रस्त्याचे केवळ २५ टक्के बांधकाम झाले आहे. परिणामी, निधी मंजूर होऊनही नागरिकांना दोन फूट खोल खड्ड्यांतून प्रवास करावा लागत आहे.

राज्य सार्वजनिक बांधकाम उपविभाग, मोहाडी यांच्यामार्फत जानेवारी २०२५ मध्ये खडकी ते ढिवरवाडा रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र, बांधकाम विभाग व कंत्राटदाराच्या संगनमताने रस्त्याचे काम अद्यापही संथगतीने सुरू होते. पावसाळ्यापासून बांधकाम बंद अवस्थेत आहे. रस्त्यावरील वर्दळ व पावसाच्या तडाख्याने लाखो रुपये खर्च करून तयार झालेला रस्ता उखडला आहे. निकृष्ट बांधकामाचा फटका वाहनचालकांना बसत आहे. रस्त्यावर दोन फुटांपर्यंत खोल खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांची गैरसोय वाढली आहे. अपघाताचा धोका निर्माण झाला असून वाहतुकीची गती मंदावली आहे. 

खड्ड्यांची दुरुस्तीही थातूरमातूर

वाहतूकदारांची ओरड वाढीस लागताच दोन दिवसांपूर्वी कंत्राटदाराच्या वतीने खोल खड्डे बुजविण्याला प्रारंभ करण्यात आला. परंतु, कामांचा दर्जा राखला जात नाही. शिवाय एक ट्रक मुरूमात खड्डे बुजविण्याचा पराक्रम विभागाकडून केला जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरणी तातडीने लक्ष घालावे. 

१५ अन्यथा दिवसांनंतर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

ढिवरवाडा ते खडकीपर्यंतच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. बांधकाम विभागाने तातडीने सुधारणा करावी. वाहतुकदारांचा जीव वाचवावा अशी अपेक्षा आहे.

निकृष्ट दर्जामुळे अल्पावधीत धिंडवडे

रस्ता बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराने निकृष्ट साहित्य वापरल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. थातूरमातूर झालेल्या कामांमुळे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच यंदाच्या पावसाने रस्त्याचे धिंडवडे काढले. खड्ड्यांत साचलेल्या पाण्यामुळे बांधकामाची पोलखोल झाली. खड्यांचा अंदाज येत नसल्याने प्रवास धोकादायक बनला असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

"खडकी ते ढिवरवाडा रस्ता बांधकामात राज्य बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. दीड वर्षानंतरही बांधकाम अपूर्ण आहे. वाहतूकदारांना अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागत आहे. वरिष्ठांनी लक्ष न घातल्यास १५ दिवसांनंतर तीव्र आंदोलन केले जाईल."- धामदेव वनवे, माजी सरपंच, ढिवरवाडा. 

English
हिंदी सारांश
Web Title : Funds Approved, Road Half-Built: Bhandara Residents Suffer for Years

Web Summary : Despite ₹10 crore allocated, Bhandara's Khadaki-Dhiwarwada road remains incomplete after 1.5 years. Poor construction and neglect have left residents navigating dangerous potholes. Locals threaten protests if repairs are not made soon.
टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा