शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
3
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
4
इंधन-गॅसचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार? शनिवारी २० जहाजांनी पार केले होर्मुझ...
5
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
6
सूट-बूट घालून आला, पाहुण्यांमध्ये मिसळला अन् ५ लाख घेऊन पळाला; Video पाहून बसेल धक्का
7
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
8
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
9
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
10
‘विकसित भारत संकल्पात पालघरचा सहभाग हवाच’ राज्यपालांच्या हस्ते डहाणूत आरोग्यसेवांचे लोकार्पण
11
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
12
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
13
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
14
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
15
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
16
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
18
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
19
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
20
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
Daily Top 2Weekly Top 5

जीवघेण्या इमारतीत धोका पत्करून कामकाज

By admin | Updated: October 14, 2016 00:24 IST

ज्या विभागाकडून बांधकामाचे नियोजन केले जाते, बांधकामाला मंजुरी दिली जाते, नव्हे बांधकाम केले जाते,

भंडारा : ज्या विभागाकडून बांधकामाचे नियोजन केले जाते, बांधकामाला मंजुरी दिली जाते, नव्हे बांधकाम केले जाते, त्याच बांधकाम विभागाची ईमारत जीर्णावस्थेत असेल आणि त्या जीवघेण्या ईमारतीत धोका पत्करून अधिकारी व कर्मचारी कामकाज करीत असेल तर त्या विभागाला ‘बांधकाम’ म्हणायचे तरी कसे? असा प्रश्न जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या ईमारतीकडे बघितल्यानंतर भयावहता लक्षात येते. वृक्ष कोसळल्यानंतर ईमारत कोसळली असती तर मोठा अनर्थ घडला असता. परंतु सर्वचजण थोडक्यात बचावले.जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे भंडारा, तुमसर, साकोली असे तीन उपविभाग आहेत. यापैकी भंडारा उपविभागाचे कार्यालय जिल्हा परिषदेच्या मागील बाजुला जीर्ण ईमारतीत आहे. ११ आॅक्टोबर रोजी या ईमारतीसमोर असलेल्या चार-पाच फुट व्यासाचे वृक्ष उन्मळून कोसळले. त्यावेळी या कार्यालयात शाखा अभियंता यांच्यासह ८ ते १० कर्मचारी व लोक होते. याच ईमारतीला लागूनच जिल्हा स्वच्छता व पाणी मिशन कक्षाचे कार्यालय आहे. या कार्यालयात १६ कर्मचारी होते. हे विशाल वृक्ष कोसळताच सर्व कर्मचारी भयभीत होऊन बाहेर पडले. ज्या ईमारतीवर हे झाड कोसळले ती ईमारतच कोसळली असती तर मोठा अनर्थ घडला असता, असे प्रत्यक्षदर्शी कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. हे कार्यालय अन्य ठिकाणी स्थांनातरण करायचे म्हटले तरी जिल्हा परिषदेकडे पर्यायी व्यवस्था नाही. आज तिसऱ्या दिवशीही हे झाड ईमारतीवर पडलेल्या स्थितीतच आहे.दरम्यान, शुक्रवारला जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीत हा मुद्दा येणार का? याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. दीड वर्षापूर्वीच्या सत्तांतरानंतर जिल्हा परिषदेच्या आवारात नवीन बांधकाम झालेले नाही, त्यापूर्वी दोन ईमारती बांधण्यात आले, आताच्या पदाधिकाऱ्यांनीही कामाला गती देण्याची गरज आहे. (जिल्हा प्रतिनिधी)३३ वर्षांपूर्वीचे गोदाम झाले कार्यालय