लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वन्यप्राणी व मानव संघर्ष दिवसेंदिवस वाढीस लागला आहे. जंगलातील फळझाडे पूर्णत: नष्ट झाली आहेत. त्यामुळे जंगलातील प्राणी गावाच्या दिशेने येत आहेत. यामुळे जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात फळवर्गीय झाडांची लागवड करणे अत्यावश्यक बाब झाली आहे. वन्यप्राण्यांना विशेषत: माकडे, हरीण व जंगलातील फळवर्गीय, पानेवर्गीय वृक्षावर जगणारे वन्यप्राणी यांच्यासाठी जंगलात फळझाडांची लागवड करणे आवश्यक झाले आहे. जंगलात फळवर्गीय, पानेवर्गीय वृक्षांची लागवड झाली की, फळवर्गीय वृक्षावर जगणाऱ्या वन्यप्राण्यांची संख्या वाढणार व फळवर्गीय जगणाºया प्राण्यांची संख्या वाढली की, मांसभक्षक जसे वाघ, बिबट यासारखे प्राणी खेडेगावाकडे किंवा जंगलव्याप्त भागाकडे धाव करणार नाहीत. त्यासाठी पावसाळ्यात जंगलात फळझाडांची लागवड करणे आवश्यक झाले आहे. यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे, फक्त झाडे लावूनच चालणार नाही तर त्यांची जोपासना योग्य पध्दतीने करुन किमान पाच ते दहा वर्षापर्यंत संगोपन करण्याचीही जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे.वनविभागाने अनेक वर्षांपासून केवळ इमारती, लाकूड मिळविण्याच्या दृष्टीनेच झाडांची लागवड केली आहे. त्यात सागवन, सिसम, बीजा यासारख्या बहुतेक झाडांचा समावेश आहे. त्यात इमारती, लाकूड मिळणाºया झाडांची संख्या अधिक असल्याचेही बोलले जात आहे. जंगलातील फळवर्गीय झाडांची संख्या वाढविण्यासाठी शासनस्तरावर प्रशासकीय यंत्रणेला पुढाकार घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. वन्यप्राणी गावाच्या दिशेने जंगलामध्ये फळवर्गीय झाडांची कमतरता असल्याने जंगलात राहणारे वानर, हरिण, डुक्कर यासारखे प्राणी गावाकडे, शेताकडे येवून पिकांचे नुकसान करीत आहेत. पयार्याने वन्यप्राणी व मानव संघर्ष वाढीला लागला आहे.
वन्यप्राण्यांसाठी फळझाडांची लागवड गरजेची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:01 IST
जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात फळवर्गीय झाडांची लागवड करणे अत्यावश्यक बाब झाली आहे. वन्यप्राण्यांना विशेषत: माकडे, हरीण व जंगलातील फळवर्गीय, पानेवर्गीय वृक्षावर जगणारे वन्यप्राणी यांच्यासाठी जंगलात फळझाडांची लागवड करणे आवश्यक झाले आहे.
वन्यप्राण्यांसाठी फळझाडांची लागवड गरजेची
ठळक मुद्देपर्यावरण प्रेमींकडून व्हावी जनजागृती । प्राण्यांचे वाढते हल्ले रोखण्यासाठी वृक्षसंर्वन महत्वपूर्ण