शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
4
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
5
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
6
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
7
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
8
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
9
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
10
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
11
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
12
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
13
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
14
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
15
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
16
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
17
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
18
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
19
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
20
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर

भंडाऱ्यातील सुनसान रस्त्यांवर प्रेमीजीवांचा सुरू असतो प्रेमालाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:43 AM

शहरातील सुनसान रस्त्यावरील अंधारे कोपरे प्रेमीजीवांच्या आवडीचे ठिकाण झाले आहेत. तोंडाला स्कार्फ बांधलेले तरुण - तरुणी अशा सुनसान रस्त्यावर रात्री - बेरात्री प्रेमालाप करताना दिसतात. शहरातीलच नव्हे तर शहरालगतच्या नवीन वसाहतीतही प्रेमीजीवांचा खुलेआम संचार असतो.

ठळक मुद्देतोंडाला स्कार्फ बांधल्याने ओळख कठीण।

अंधाऱ्या गल्ल्या आणि नवीन वसाहतीत ठिय्यालोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील सुनसान रस्त्यावरील अंधारे कोपरे प्रेमीजीवांच्या आवडीचे ठिकाण झाले आहेत. तोंडाला स्कार्फ बांधलेले तरुण - तरुणी अशा सुनसान रस्त्यावर रात्री - बेरात्री प्रेमालाप करताना दिसतात. शहरातीलच नव्हे तर शहरालगतच्या नवीन वसाहतीतही प्रेमीजीवांचा खुलेआम संचार असतो. त्यांना कुणी हटकले तर आपल्या वाहनाला किक मारतात आणि निघून जातात.भंडारा शहर शांत आणि ग्रामीण वळणाचे आहे. मात्र अलिकडच्या काही दिवसात शहरातील काही रस्ते नाहक बदनाम होत आहेत. खामतलाव परिसरातून एमएसईबी कॉलनीकडे जाणाºया रस्त्यावर रात्री ९ ते १० च्या दरम्यान हमखास प्रेमीजीव वार्तालाप करताना दिसून येतात. महाविद्यालयीन परिसराच्या मागच्या बाजूला असलेल्या झुडुपांमध्येही भर दिवसा राघू मैनेची जोडी बसलेली असते. अनेकदा तर या परिसरात नको त्या वस्तू पडलेल्या आढळून येतात. त्यावरून या परिसरात वार्तालापच नव्हे तर बरेच काही सुरु असल्याचे लक्षात येते. यासोबतच शहरातील निर्माणाधिन वसाहती सध्या प्रेमीजीवांसाठी अतिशय प्रिय झाल्या आहेत. दुपारच्या वेळी या परिसरात कुणीही नसते. तापत्या उन्हात तर हा परिसर निर्मनुष्य असतो. उन्हातान्हाची पर्वा न करता प्रेमीजीव या ठिकाणी एकत्र येतात. भंडारा शहरालगत असलेल्या वैनगंगेच्या तिरावरील कोरंभी परिसरात तर जणू प्रेमीजीवांचे संमेलन भरल्याचा भास होतो. रावणवाडी तलावाकडे जाणारा रस्ताही अशा गर्दीने फुललेला असतो. तोंडाला स्कार्फ असल्याने वडीलांनाही आपल्या मुलाला आणि मुलीला ओळखणे कठीण होते. नैतिकतेची पातळीच खालावली.दामिनी पथक अशा प्रेमीजीवांना वठणीवर आणण्याचे काम करते. जिल्हा पोलीस दलाने या पथकाची निर्मिती केली आहे. मात्र या पथकाचे लक्ष पर्यटनस्थळावरील प्रेमी युगुलांकडे असते. शहरातील गल्ल्यांमध्ये रात्रीच्या वेळी गस्त घातल्यास अशा प्रकाराला आळा घालता येऊ शकतो. सामाजिक स्वास्थ बिघडविण्यावर अंकुश मात्र कुणाचही दिसत नाही