शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
6
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
7
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
8
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
9
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
10
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
11
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
12
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
13
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
14
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
15
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
16
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
17
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
18
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
19
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
20
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

मोहाडी पंचायत समितीत मद्यपी कर्मचाऱ्यांत फ्री स्टॉईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 5:00 AM

मोहाडी पंचायत समितीत ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी असते. शुक्रवारी नेहमीप्रमाणे गाव खेड्यातून कामाच्या निमित्ताने अनेक जण आले होते. दुपारच्या वेळी तीन कर्मचारी मद्य प्राशन करून आवारात गोंधळ घालत होते. काही वेळातच यात हाथापायी होवून मारामारी सुरू झाली. यात मनरेगा विभागातील एक, बीपीएल टेबल सांभाळणारा एक कर्मचारी आणि एका शिपायाचा समावेश होता.

ठळक मुद्देबघ्यांची जमली होती मोठी गर्दी । कर्मचाऱ्यांवर कुणाचेही नियंत्रण नाही

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : पंचायतराज व्यवस्थेतील महत्वाचा दूवा असलेल्या मोहाडी पंचायत समितीचा कारभार चांगलाच ढेपाळला असून शुक्रवारी तर पंचायत समितीच्या आवारातच मद्यपी तीन कर्मचाऱ्यात फ्री स्टॉईल झाली. हा प्रकार पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. परंतु अद्यापर्यंत यासंदर्भात कुणीही तक्रार केली नाही. परंतु पंचायत समितीच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली गेली.मोहाडी पंचायत समितीत ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी असते. शुक्रवारी नेहमीप्रमाणे गाव खेड्यातून कामाच्या निमित्ताने अनेक जण आले होते. दुपारच्या वेळी तीन कर्मचारी मद्य प्राशन करून आवारात गोंधळ घालत होते. काही वेळातच यात हाथापायी होवून मारामारी सुरू झाली. यात मनरेगा विभागातील एक, बीपीएल टेबल सांभाळणारा एक कर्मचारी आणि एका शिपायाचा समावेश होता. अश्लिल शिवीगाळ करत सार्वजनिकरित्या गोंधळ सुरू होता. याठिकाणी उपस्थित असलेल्या महिलांनी तर शरमेने मान खाली घातली. गट विकास अधिकाऱ्यांकडे याची तक्रार करण्यात आली. दोन कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे.मोहाडी पंचायत समितीत काही कर्मचारी दारूच्या नशेत असतात. सध्या पंचायत समितीवर प्रशासक असल्याने त्यांच्यावर कुणाचाही वचक नाही. ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांचेही वेळेवर काम होत नाही.मोहाडी पंचायत समितीत काही दारूडे कर्मचारी प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगत आहेत. येथे येणाºया गावकºयांशी नेहमी हुज्जत घालतात. कार्यालयात कमी आणि टपरीवर अधिक वेळ बसून असतात. या कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने त्यांचे मनोबत वाढत आहे. शुक्रवारी झालेल्या प्रकाराबाबत गटविकास अधिकारी पल्लवी वाडेकर यांना विचारणा केली त्यावेळी या प्रकरणाबाबत काही माहिती हवी असल्यास सोमवारी कार्यालयात प्रत्यक्ष भेटा. मी मोबाईवर माहिती देणार नाही, असे सांगितले.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समिती