कारवाईत रेतीची अवैध वाहतूक करणारे चार टिप्पर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 05:00 AM2021-10-18T05:00:00+5:302021-10-18T05:00:24+5:30

मोहाडी येथे नवीन तहसीलदार दीपक कारंडे रुजू झाल्यापासून महसूल विभाग चांगलाच ‘ॲक्शन मूड’ मधे आला असून, अवैध गौण खनिजावर आळा घालण्यासाठी धाड सत्र सुरू करण्यात आले असल्याचे पहावयास मिळत आहे. दोन दिवसांपूर्वीच अवैध मुरूम काढणाऱ्या पाच वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली होती, तर आज रविवारी रेतीच्या अवैध चार टिप्परवर कारवाई करून जप्त करण्यात आले. 

Four tippers carrying illegal sand were seized during the operation | कारवाईत रेतीची अवैध वाहतूक करणारे चार टिप्पर जप्त

कारवाईत रेतीची अवैध वाहतूक करणारे चार टिप्पर जप्त

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : तालुक्यातील निलज रेती घाटावरून अवैध रेती वाहून नेणाऱ्या चार टिप्परवर बोरगाव शिवारात जप्तीची कारवाई नायब तहसीलदार मोरेश्वर हुकरे यांनी रविवारी सकाळी केली. या कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे. 
मोहाडी येथे नवीन तहसीलदार दीपक कारंडे रुजू झाल्यापासून महसूल विभाग चांगलाच ‘ॲक्शन मूड’ मधे आला असून, अवैध गौण खनिजावर आळा घालण्यासाठी धाड सत्र सुरू करण्यात आले असल्याचे पहावयास मिळत आहे. दोन दिवसांपूर्वीच अवैध मुरूम काढणाऱ्या पाच वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली होती, तर आज रविवारी रेतीच्या अवैध चार टिप्परवर कारवाई करून जप्त करण्यात आले. 
गुप्त माहितीच्या आधारे निलज घाटावरून  अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर मालक दीपक मानापुरे रा. नागपूर यांचा टिप्पर (एम.एच. ४०, ए. के. २४३८), राहुल स्वामी (रा. नागपूर) यांचा एम.एच.४०/बी.जी.१२७१, लोकेश जैन (रा. नागपूर) यांचा एम.एच. ४०/ बी.एफ. १५३३ आणि एम.एच. ४०/ बी. एफ. ४१९४ या चार टिप्परवर जप्तीची कारवाई करून पोलीस स्टेशन करडी येथे जमा करून ठेवण्यात आले आहे. 
तहसील कार्यालयाचे वाहन टिप्परसमोर आडवे येताच दोन टिप्परचालक टिप्पर सोडून फरार झाले. 
त्यानंतर टिप्परमालकांना बोलावून कारवाई करण्यात आली. ही कारवाई नायब तहसीलदार मोरेश्वर हुकरे, तलाठी पी. व्ही. घोडेस्वार, तलाठी व्ही. ए. कांबळे, कोतवाल चंदन नंदनवार, चालक चंदू बावणे यांच्या चमूने पार पाडली. या कारवाईमुळे इतर घाटावर सुरू असलेली रेती चोरीच्या वाहनांची पळापळ सुरू झाली होती, अशी चर्चा आहे.

Web Title: Four tippers carrying illegal sand were seized during the operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app