ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 00:37 IST2025-04-28T00:37:06+5:302025-04-28T00:37:53+5:30
मृतांमध्ये सर्व नागपूर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे

ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
भंडारा: राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील बेला येथे साईप्रसाद हॉटेल समोर घडलेल्या ट्रक- बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवार रात्री १० वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास घडली. अपघात एवढा भीषण होता की, घटनास्थळीच चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सर्व नागपूर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे घटनास्थळी ताफ्यासह दाखल झाले आहेत. मृतक आणि जखमी यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात बोलेरो गाडीचा चेदामेंदा झाला आहे. गंभीर जखमी एका व्यक्तीवर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहेत.