शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्राचे फ्लोरिंग चार वर्षांतच उखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:40 IST

लाखांदूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत चार वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या तालुक्यातील कुडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे फ्लोरिंग उखडल्याचा प्रकार उघडकीस आला ...

लाखांदूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत चार वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या तालुक्यातील कुडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे फ्लोरिंग उखडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बांधकामात गैरव्यवहार झाल्याने फ्लोरिंग उखडल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथे २०१६ मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसह आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सदनिकांचे बांधकाम केले होते. सदर बांधकाम निकृष्ट होत असल्याचा आरोप त्यावेळीही करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी कुणी लक्ष दिले नाही. आता आरोग्य केंद्रातील अनेक कक्षातील फ्लोरिंग उखडले असून टाईल्स बाहेर आल्या आहेत. फ्लोरिंग करताना टाईल्सखाली पुरेशा प्रमाणात मातीचा भराव न झाल्याने आणि त्यावरच सिमेंट काँक्रीटने बांधकाम केल्याने फ्लोरिंग उखडल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीदेखील या इमारतीची दुरुस्ती करण्यात आल्याची माहिती आहे. अल्पावधीतच पुन्हा फ्लोरिंग उखडल्याने ही इमारत वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना उखडलेल्या फ्लोरिंगचा त्रास सहन करावा लागतो. अनेकदा त्यात पाय अडकून अनेक जण पडतात. नातेवाईकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन सदोष इमारत बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारासह अभियंत्यावर कारवाई करावी तसेच दोषी अधिकारी शोधून त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. आधीच भंडारा रुग्णालयातील अग्निकांडाने संपूर्ण जनता हादरुन गेली आहे. यानंतर आरोग्य यंत्रणा सुधारेल अशी अपेक्षा होती. परंतु, कुडेगाव आरोग्य केंद्रातील फ्लोरिंग उखडण्याचा प्रकार पाहता कोणतीही सुधारणा दिसून येत नाही.