शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींच्या सदनिका रिकाम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 05:00 IST

तुमसर शहराच्या पूर्वेला शिवाजी नगरात मध्यवर्तीस्थानी १८ सदनिका आहेत. येथील बांधकाम दर्जेदार असून प्रशस्त अशा सदनिका आहेत. मागील दहा वर्षापूर्वी सदनिकांचे बांधकाम करण्यात आले होते. त्यानंतर सुरुवातीच्या काळात काही वर्षे येथे कर्मचारी व अधिकारी वास्तव्यासही होते. त्यानंतर सदनिका रिकाम्याच आहेत. सातत्याने दुर्लक्ष झाल्यानंतर देखभालीसाठी कुणीही दखल घेतली नाही.

ठळक मुद्देदूरसंचार विभाग : परिसराला वेढले झुडपांनी

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : एकीकडे कर्मचारी व अधिकाऱ्यांना वास्तव्याकरिता सदनिका मिळत नाही, परंतु तुमसर येथील दूरसंचार विभागाच्या कोट्यवधींच्या सदनिका शहराच्या मध्यभागी असूनही रिकाम्या पडून आहेत. सदनिका परिसरात लहान मोठी झाडे वाढली आहेत. खिडक्यांची तावदाने तुटली आहेत. संबंधित विभागाने कर्मचारी वर्ग पूर्वीसारखा नाही. त्यामुळे सदनिका भाडे तत्वावर देण्याची गरज आहे.तुमसर शहराच्या पूर्वेला शिवाजी नगरात मध्यवर्तीस्थानी १८ सदनिका आहेत. येथील बांधकाम दर्जेदार असून प्रशस्त अशा सदनिका आहेत. मागील दहा वर्षापूर्वी सदनिकांचे बांधकाम करण्यात आले होते. त्यानंतर सुरुवातीच्या काळात काही वर्षे येथे कर्मचारी व अधिकारी वास्तव्यासही होते. त्यानंतर सदनिका रिकाम्याच आहेत. सातत्याने दुर्लक्ष झाल्यानंतर देखभालीसाठी कुणीही दखल घेतली नाही.तुमसर तालुका मुख्यालयात दूरसंचार विभागात केवळ तीन कर्मचारी असल्याची माहिती आहे. येथील काही कर्मचाऱ्यांनी डिसेंबर २०१९ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने सदर कर्मचारी आता त्या प्रमाणात कार्यरत नाही. तर काहींनी स्वत:चे घर बांधले. त्यामुळे सदनिकेत कुणीच वास्तव्याला नाहीत.कोरोना लॉकडाऊनपूर्वी स्थानिक पोलीस प्रशासनाने संबंधित विभागाकडे सदनिका भाड्याने देण्याची परवानगी मागितली. परंतु कोरोना काळात सदर प्रक्रिया थांबली. पुढे प्रक्रिया वरिष्ठ अधिकाºयांकडून पूर्ण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.सदनिकेत कुणीच राहत नाही. सदनिका आवारात लहान मोठी झाडे वाढली आहेत. टवाळखोरांनी सदनिकांच्या खिडक्यांची तावदाने दगडाने फोडली आहेत. कोट्यवधींच्या सदनिका अशाच राहिल्या तर मोडकडीस येण्यास वेळ लागणार नाही.परंतु सध्या कुणाचेही लक्ष याकडे नाही.तुमसर येथील सदनिकांची स्थिती उत्तम आहे. कर्मचारी संख्या कमी असून येथे सध्या कुणी राहत नाही. पोलीस विभागाने सदनिका भाड्याने मागितल्या आहेत. याचा निर्णय वरिष्ठ अधिकारी घेतील.- संदीपकुमार सिम्पलेकर,दूरसंचार विभाग भंडारा

टॅग्स :BSNLबीएसएनएल