जनावर तस्करीत पाच अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:55 IST2018-11-30T00:54:08+5:302018-11-30T00:55:33+5:30
कत्तलीसाठी जाणाऱ्या बारा जनावरांची सुटका करुन पाच जणांना अड्याळ पोलिसांनी अटक केली. ही कारवाई नेरला उपसा सिंचन समोर करण्यात आली. ११ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जनावर तस्करीत पाच अटकेत
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कत्तलीसाठी जाणाऱ्या बारा जनावरांची सुटका करुन पाच जणांना अड्याळ पोलिसांनी अटक केली. ही कारवाई नेरला उपसा सिंचन समोर करण्यात आली. ११ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
विजय नामदेव बोंदरे (२६) रा. पारडी ता. मोहाडी, शिवा किशन हेपट (४०) रा. धानोरा पिंपरी जिल्हा चंद्रपूर, उमेश कृष्णराव हजारे (३४) रा. कुही जि. नागपूर, सचिन शंकर पिंपळकर (३२) रा. पिपरी, शशांक बाजीराव लांजेवार (२६) रा. दवडीपार ता. भंडारा अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. अड्याळचे ठाणेदार सुरेश ढोबळे आपल्या सहकार्यासह बुधवारी रात्री गस्तीवर होते. त्यावेळी नेरला उपसा सिंचन समोर पीकअप वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी तीन पिकअप वाहनात १२ बैल आढळून आले. अत्यंत निर्दयतेने जनावरांची वाहतुक केली जात होती. त्यावरुन पाच जणांना अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुरेश ढोबळे, पोलीस शिपाई मिलींद बोरकर, हवालदार सत्यवान हेमने यांनी केली.