भंडारा जिल्ह्यात रानडुकराच्या हल्ल्यात पाच मजूर गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 13:45 IST2020-03-24T13:45:04+5:302020-03-24T13:45:24+5:30
हरभरा काढण्यासाठी शेतात गेलेल्या मजूरावर रानडुकराने हल्ला केल्याने पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना लाखनी तालुक्यातील शिवनी मोगरा येथे मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.

भंडारा जिल्ह्यात रानडुकराच्या हल्ल्यात पाच मजूर गंभीर जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : हरभरा काढण्यासाठी शेतात गेलेल्या मजूरावर रानडुकराने हल्ला केल्याने पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना लाखनी तालुक्यातील शिवनी मोगरा येथे मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. जखमींना उपचारासाठी लाखनीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दसाराम गोमाजी लसुंते (६०), ताराबाई वासूदेव लसुंते (६५), इंदूबाई फत्तूजी चेटूले (५५) सर्व रा. चिचटोला, बबीता तुषार ईश्वरकर (२६), चिंतामण शेंडें (६५) रा. शिवनी मोगरा अशी जखमींची नावे आहे. मंगळवारी सकाळी हरभरा काढणीसाठी मजूर शेतात गेले होते. सकाळी १० वाजताच्या सुमारास रानडुकराने अचानक हल्ला केला. त्यात पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींना पंचायत समिती सदस्य पंकज श्यामकुंवर यांनी रुग्णालयात दाखल केले. वनविभागात माहिती देण्यात आली. आधीच कोरोनाची धास्ती असताना रानडुकराच्या हल्ल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे