शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

दोन अपघातात पाच जखमी

By admin | Updated: June 24, 2016 01:16 IST

जवाहर गेटसमोर पवनी-भंडारा मार्गावर रेती भरून आलेल्या ट्रकने स्कुटीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघे जखमी झाले.

ट्रकची कंटेनरला धडक : रेती भरलेल्या ट्रकची दुचाकीस धडकपवनी : जवाहर गेटसमोर पवनी-भंडारा मार्गावर रेती भरून आलेल्या ट्रकने स्कुटीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघे जखमी झाले. भारतीय स्टेट बँकेच्या महिला कर्मचारी गंभीररित्या जखमी असल्याने उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.रेतीघाटावरून भरधाव वेगाने आलेल्या ट्रक क्र. एमएच ४० वाय २७५६ ने जवाहर गेट समोरील बसस्थानकाजवळ सकाळी १०.१५ चे सुमारास स्कुटी क्रमांक एमएच ३६ पी ९७८६ ला मागचे बाजूस धडक दिल्याने स्कुटी चालक सईद अली खान व मागे बसलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या महिला कर्मचारी लीना निमजे, जवाहरनगर उसळून खाली पडल्या. बाजूने जाणारी एक वृद्ध महिला रस्त्यावर पडल्याने जखमी झाली. लीना निमजे यांचे गुडघ्याला, डोक्याला दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. वृद्ध महिलेस खाजगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. किरकोळ जखमी सईद अली खान यास ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले आहे. रेतीघाटावरून ओवरलोड व भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यांचे वेगावर व अवैध वाहतुकीवर आळा घालण्यास महसूल व पोलीस प्रशासनास अपयश येत असल्याने रेतीमाफियांची मुजोरी वाढत चालली आहे. जिल्हा प्रशासनाने रेती वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी जनतेने केली आहे.जवाहरनगर : राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला उभा असलेल्या कंटेनरला मागेहून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यात ट्रकमधील दोन इसम जखमी झाले. दोघांनाही उपचारार्थ सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात आले. ही घटना बुधवारला रात्री ११.३० वाजता सुमारास राष्ट्रीय महामार्ग ठाणा उड्डाणपुलावर घडली.विक्की लिल्हारे (२७) व अनिल बेहरे (२८) दोन्ही रा. वाटोना नागपूर असे जखमीचे नाव आहे. राजनांदगावहून नागपूरकडे रिकाम्या पिपाची वाहतुक करणाऱ्या ट्रक क्रमांक एम.एच. ३१ ए.पी. २८८३ ने डिझलची प्रतिक्षा करीत असलेल्या ट्रेलर कंटेनर क्रमांक एमएच ४० वाय १५६९ ला मागेहून जोरदार धडक दिली. घटनेनंतर ट्रकचालक घटनास्थळाहून पसार झाला. त्याच्याविरूद्ध जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)