शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

मोहाडी तहसील कार्यालयावर मासेमारांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 01:28 IST

विमुक्त भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग, मासेमार समाजाच्या विविध मागण्यांसाठी सोमवारला मासेमार बांधवांनी मोहाडी तहसील कार्यालयावर ‘दे धक्का’ मोर्चा काढून शासनाला निवेदन सादर केले.

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : प्रलंबित मागण्या सोडविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : विमुक्त भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग, मासेमार समाजाच्या विविध मागण्यांसाठी सोमवारला मासेमार बांधवांनी मोहाडी तहसील कार्यालयावर ‘दे धक्का’ मोर्चा काढून शासनाला निवेदन सादर केले.१३ डिसेंबर २०१७ ला विधानसभेवर मासेमार बांधवांचा विराट मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी जी आश्वासने दिली होती ती पाळण्यात आली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेत विमाप्र व विमुक्त भटक्या जमातींना स्वतंत्र १३ टक्के आरक्षण द्यावे, लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पात विशेष आर्थिक तरतूद करून सवलती देण्यात याव्या, तलाव ठेका रक्कम ५० टक्के कमी करण्यात यावी, मच्छीमार संस्थांना १८०० रुपये प्रती हेक्टर प्रमाणे देण्यात येणारा ठेका कमी करण्यात यावा,मासेमार समाजाला १९६६ च्या कलम १६८ नुसार मासेमारीचा हक्क राजस्व रेकॉर्डवर चढविण्यात यावा, संस्था नोंदणीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून मोठे भांडवलदार समाजाच्या काही लोकांना हाताशी धरून संस्था नोंदणी करून ओपन टेंडरच्या नावाखाली परंपरागत मासेमारांना बेदखल केले जात आहे. त्यावर अंकुश लावण्यात यावा, पेसा कायद्यानुसार तलावातील मासेमारीचे हक्क ग्रामपंचायतींना देण्यात आल्याने मच्छीमारांवर संकट कोसळले आहे.तो कायदा रद्द करण्यात यावा, वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे जंगल परिसरातील तलावावर मासेमारी करण्यास अटकाव केल्या जात आहे. त्यामुळे वंश परंपरागत मासेमारी करणाऱ्यांचे पुनर्वसन करण्यात यावे, निलक्रांती योजनेच्या पैशाची होत असलेली लुट थांबवून खºया लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात यावा, निलक्रांती योजनेतील गैरकारभाराची सखोल चौकशी करण्यात यावी, माजी खासदार जतीराम बर्वे यांची कर्मभूमी हीच मासेमारांची दीक्षाभूमी असल्याने त्यांच्या स्मृतीचे जतन करण्यात यावे, मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्तीचे प्रलंबित प्रकरणी त्वरीत निकाली काढण्यात यावे, घरकुल योजनेत मासेमार बांधवांना अग्रक्रम देण्यात यावा व घरकुलाची किंमत ३.१५ लक्ष ठरविण्यात यावी, वनवासी भटक्या जमातींनी केलेले अतिक्रमण नियमित करून मालकी हक्क देण्यात यावा इत्यादी मागण्यांचे निवेदन तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, दुग्ध व मत्स्य व्यवसाय मंत्री यांना पाठविण्यात आले. याप्रसंगी कमलेश कनोजे, खुशाल कोसरे, मधुकर मारबते, हनेश माहालगावे, ज्ञानेश्वर मारबते, नरेश देवगडे, गणेश मारबते, हरिश्चंद्र बर्वे, रविंद्र मारबते, देवराम बांगडकर, सुनिल वलथरे, इस्तारी बर्वे, भोजराम नागपुरे, प्रकाश डोंगरवार, नगरसेवक कविता बावणेसह शेकडो समाजबांधव उपस्थित होते.

टॅग्स :Morchaमोर्चा