लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारेकरांनी आनंद, उत्साहात दिवाळी साजरी केली. मात्र, गुरुवारी सकाळी या उत्साह व आनंदाची दुसरी बाजू शहरातील रस्त्यांवर पसरलेल्या फटाक्यांच्या कचऱ्याच्या रुपात पहायला मिळाली. बुधवारी लक्ष्मीपूजन, त्यानंतर भाऊबीजेला फटाक्यांच्या आवाजाने अनेकांच्या कानठळ्या बसल्या. फटाक्यांच्या आतषबाजीचे दुष्परिणाम वातावरणातही जाणवले. हवेत धुराळा पसरला होता. पहाट उजाडली तेव्हा रस्त्यावर फिरणाºयांना श्वास घेताना दम लागत होता. काहींचे डोळेही जळजळ करीत होते. रस्त्याच्या दोन्ही कडेला फटाक्यांच्या आतषबाजीचे अवशेष पसरले होते. फटाक्यांच्या दुष्परिणामांची जाणीव असतानाही अनेकांना स्वत:च्या आनंदासाठी सामाजिक जाणिवेचाही विसर पडला. मोठया आवाजांचे फटाके फोडणाºया रस्त्यावर फटाक्यांच्या कचरा करणाºयाांवर कारवाई होणार की नाही, यांना कोण फटाके लावणार, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.शहराच्या सर्वच भागात मागील दोन दिवसांपासून गल्लोगल्ली व मोठ्या रस्त्यावर फुटलेल्या फटाक्यांचे अवशेष पडलेले होते. सकाळी उठून महिलांनी घरासमोरील केराच्या स्वरुपात फटाक्यांचा कचरा झाडला. काहींनी केर गोळा करून रस्त्याच्या कडेला जाळून टाकला. मात्र रस्त्यावर पसरलेल्या फटाक्यांचा कचरा स्वच्छ करण्याची कुणी तसदी घेतली नाही. कदाचित स्वच्छचा कर देत असल्याने, पालिकेचे साफसफाई कर्मचारी हा कचरा काढतील, अशी अपेक्षा होती. गल्लीबोळीत फटाक्यांच्या कचरा रस्त्यावर दिवसभर तसाच पडून होता. आपणच केलेला कचरा उचलण्याची कुणी हिंमत दाखविली नाही.स्वच्छता अभियानाच्या नावाने पुढेपुढे करणारे स्वच्छता दूतही दिसले नाही. पंतप्रधानांनी देशभरात राबविलेल्या स्वच्छता अभियानात, कचरा नसतानाही हातात झाडू घेऊन रस्ता स्वच्छ करणारे डोळ्यासमोर पडून असलेला कचरा स्वच्छ करण्यासाठी पुढे आले नाही. उलट अभियानातील हेच स्वच्छता दूत (कार्यकर्ते) फटाक्यांचे प्रदूषण व कचरा करण्यात अग्रेसर दिसून आले.फटाक्यामुळे अस्वच्छतेसोबतच वातावरणही प्रदूषित झाले होते. फटाक्यांची ध्वनी तीव्रता १२५ डेसिबल पेक्षा अधिक नसावी, असा नियम आहे. परंतु फटाक्यांच्या ध्वनी तीव्रतेचा उल्लेख फटाक्यांवर नसल्याने १२५ डेसिबलपेक्षा अधिक आवाजाचे फटाके जोरात फुटले. रात्री १० नंतर फटाके फोडण्यावर बंदी असतानाही उशिरापर्यंत फटाक्यांच्या आवाजांनी शहर दणाणत होते. आधीच शहरातील पर्यावरणावर प्रदूषणाचे परिणाम दिसत आहे. फटाक्यांमुळे प्रदूषणाच्या पातळीत वाढ झालेली होती.आरोग्यावर परिणामफटाक्यांच्या आतषबाजीमुळे बराच काळ वातावरणामध्ये धूर पसरलेला दिसला. रात्रीला बाहेर पडलेल्यांना फटाक्यांच्या आतिषबाजीचा परिणाम भोगावा लागला. डोळे चुरचुरणे, श्वासोश्वास घेण्याला त्रास होणे, संपूर्ण वातावरणात दुर्गंध पसरलेली होती. या प्रदूषणाचा थेट शरीरावर परिणाम जाणवला नसला तरी, त्यामुळे अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु लहान मुलांना, पाळीव प्राण्यांना फटाक्यांचा नक्कीच फटका बसला. दिवाळीत फटाके उडविण्यावर बंदी आणता येणार नाही, असे स्पष्ट केले असले तरी, पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी एक जबाबदार प्रक्रिया असण्याची गरज व्यक्त केली आहे. यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सर्व महानगर पालिका यांना फटाक्यांच्या वाईट परिणामांबद्दल जास्तीत जास्त प्रसिद्धी करण्याचे मार्गदर्शक आदेश दिले आहे. तसेच पर्यावरण स्वच्छता शुल्काच्या स्वरुपात जमा झालेला निधी फटाके फोडल्याने निर्माण झालेल्या कागदी घनकचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी करावा, असेही आदेश काढण्यात आले होते. शाळा, धार्मिक स्थळे, शांतता स्थळे या परिसरात फटाके फोडणाºयांवर कारवाई करावी, फटाक्यांची ध्वनी तीव्रता (डेसिबल) आणि त्यात वापरलेले घटक यांचा उल्लेख फटाक्यांवर नसेल तर फटाके उत्पादक आणि विक्रेत्यावर गुन्हे नोंदवावेत. तसेच रात्री ८ ते १० वाजतापर्यत केवळ दोन तास फटाके फोडावे, असे असतानाही या नियमांकडून पुरते दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले.किती घातक आहेत फटाकेफटाक्यांमध्ये पोटॅशियम नायट्रेड, सोडियम , चारकोल, सल्फर, कॉपर, मॅग्नेशियम, कॅडमियम, लेड, झिंक, आयरनसारख्या रासायनिक पदार्थांचा समावेश असतो. आकाशात आतिषबाजी करणाऱ्या फटाक्यांमध्ये निळा आणि हिरवा रंग दर्शविण्यासाठी कॉपरचा उपयोग होतो. मॅग्नेशियमचा उपयोग चकाकणाऱ्या पांढऱ्या रंगासाठी होतो. सोडियमद्वारे सोनेरी व पिवळा रंग उधळतो. सल्फर, चारकोलचा फ्युअल म्हणून उपयोग होतो. झिंक धूर सोडतो. ही सर्व रसायने वातावरण प्रदूषित करतात. कॉपरमुळे डोळे चुरचुरतात व श्वास घेण्यास त्रास होतो, कॅडमियममुळे रक्ताची कमतरता व किडनीवर परिणाम होतो, लेड श्वसन प्रक्रियेवर, मॅग्नीज अँण्ड नायट्रेट मेंदूवर, झिंकमुळे उलटी होते, सोडियम त्वचेवर परिणाम होतात.
फटाक्यांचा कचरा पसरला रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 22:07 IST
भंडारेकरांनी आनंद, उत्साहात दिवाळी साजरी केली. मात्र, गुरुवारी सकाळी या उत्साह व आनंदाची दुसरी बाजू शहरातील रस्त्यांवर पसरलेल्या फटाक्यांच्या कचऱ्याच्या रुपात पहायला मिळाली.
फटाक्यांचा कचरा पसरला रस्त्यावर
ठळक मुद्देहवेत मोठ्या प्रमाणात प्रदूषण : आनंदात विसरले सामाजिक भान, स्वच्छता मिशनचेही तीनतेरा