शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांची आर्थिक लुबाडणूक थांबणार

By admin | Updated: October 28, 2014 22:53 IST

प्राथमिक शिक्षकांचे मासिक वेतन देयके शालेय वेतन प्रणालीनुसार तयार करण्यासाठी शिक्षकांना दरमहा आर्थिक भुर्दंड बसत होता. मात्र या संदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी

भंडारा : प्राथमिक शिक्षकांचे मासिक वेतन देयके शालेय वेतन प्रणालीनुसार तयार करण्यासाठी शिक्षकांना दरमहा आर्थिक भुर्दंड बसत होता. मात्र या संदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर शिक्षकांची आर्थिक लुबाडणूक थांबण्याचे चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे शिक्षकांमध्ये आनंद व्याप्त आहे.संघातर्फे जिल्हाध्यक्ष मुबारक सैय्यद यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शिक्षकांनी वेतन देयक तयार करण्याची जबाबदारी पंचायत समिती स्तरावर गटशिक्षणाधिकारी यांच्या अधिनस्त डाटा एन्ट्री आॅपरेटर व एम.आय.एस. यांच्यावर थोपविण्यात आली आहे. त्यामुळे नोव्हेंबर पासून वेतन तयार करण्याचे काम पंचायत समिती स्तरावर गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे आहे. त्यामुळे मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या सूचनेनुसार सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या अधिनस्त शिक्षकांच्या वेतनासंबंधी माहितीसह गटशिक्षणाधिकारी यांनी निश्चित केलेल्या तारखेला पंचायत समितीमध्ये उपस्थित होणे आहे. आॅपरेटरकडून शाळेच्या देयकाची एक प्रत लॉग इन करून मुख्याध्यापकांनी स्वीकारायची आहे. या पत्रान्वये कारवाईसंबंधाने पुढाकार घेऊन तालुका संघाने कारवाई करावी. असे आदेश मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी दिले आहे. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष मुबारक सैय्यद, संजीव बावनकर, राजेश सूर्यवंशी, विरेंद्र निंबार्ते, धनंजय बिरणवार, राधेशाम आमकर, विनायक मोथारकर, तेजराम वाघाये, रजनी करंजेकर, अनिल गायधने, राजन सव्वालाखे, दिलीप बागडे, रामरतन माहुर्ले, धनंजय नागदेवे, राकेश चिचाम, अरविंद रामटेके आदींचा समावेश होता. (नगर प्रतिनिधी)