शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

पंधरा फुटाचा रस्ता झाला सात फुटांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2022 05:00 IST

अतिक्रमण या समस्येला उग्ररूप देण्याचे कार्य रस्त्यावर दुकानदारी थाटणाऱ्यांनी  केले आहे. विशेष म्हणजे या अतिक्रमण करणाऱ्यांना टोकले किंवा रोखले असता, चक्क अरेरावी आणि गुंडगिरीची भाषा वापरली जाते. वेळप्रसंगी चाकुही काढला जातो. रस्ता आपण खरेदी केला आहे, या अविर्भावात बोलीभाषेचा वापर केला जातो. येथून दुचाकी नेणे म्हणजे कसरतच आहे. याबाबत पालिका प्रशासन तसेच वाहतूक पोलीस शाखा मूग गिळून का आहे, हे  न उलगडणारे कोडे आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अतिक्रमणाने गजबजलेल्या भंडारा शहरात मोठा बाजार परिसरही यातून सुटलेला नाही. मोठा बाजारातील बीएसएनएलच्या ग्राहक व सेवा केंद्र लागून असलेल्या लहान चौक ते बस स्टॉपकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्यावर अतिक्रमणाने कहर केला आहे. विशेष म्हणजे काही दुकानदारांनी साहित्य झाकण्यासाठी रस्त्यावरच चक्क हिरवी पाल ताणली आहे. रस्ताच आच्छादित करण्यात आलेला आहे. रस्त्यावर थाटलेल्या दुकानांमुळे पंधरा फुटांचा रस्ता आता अवघ्या सात फुटांचा राहिला आहे. अशा स्थितीत अपघात घडणार, यात शंकाच उरली नाही. अतिक्रमण या समस्येला उग्ररूप देण्याचे कार्य रस्त्यावर दुकानदारी थाटणाऱ्यांनी  केले आहे. विशेष म्हणजे या अतिक्रमण करणाऱ्यांना टोकले किंवा रोखले असता, चक्क अरेरावी आणि गुंडगिरीची भाषा वापरली जाते. वेळप्रसंगी चाकुही काढला जातो. रस्ता आपण खरेदी केला आहे, या अविर्भावात बोलीभाषेचा वापर केला जातो. येथून दुचाकी नेणे म्हणजे कसरतच आहे. याबाबत पालिका प्रशासन तसेच वाहतूक पोलीस शाखा मूग गिळून का आहे, हे  न उलगडणारे कोडे आहे. 

हाकेच्या अंतरावर वाहतूक पोलीस चौकी  - भंडारा जिल्ह्याची वाहतूक व्यवस्था ज्यांच्या खांद्यावर आहे, त्यांचेच कार्यालय पोस्ट ऑफिस चौकात आहे. अतिक्रमीत रस्त्याहून अवघ्या पन्नास मीटर अंतरावरच जिल्हा वाहतूक शाखेचे कार्यालय आहे; मात्र त्यांनाही ती समस्या दिसत नाही. याचेही नवलच वाटायला हवे. वाहतूक कार्यालयासमोरील जागा मोकळी ठेवली जाते; मात्र बाजारातील अन्य अतिक्रमण दिसत नाही, हाच मोठा नवलाचा विषय आहे. रस्त्यावर उभारलेल्या आच्छादनाने एखाद वेळी मोठा अपघात घडू शकतो, असे असतानाही याकडे कानाडोळा हाेत आहे.

जप्तीची कारवाई हवी - रस्त्यावर साहित्य ठेवून रस्ताच गिळंकृत करण्याचा सपाटा लावला आहे. साहित्य खरेदीसाठी येणारे ग्राहकही तिथेच उभे राहून जीव धोक्यात घालून  खरेदी करतात. एकंदरीत या रस्त्यावर कुठेही पार्किंग नाही. उन्हापासून बचाव करण्याकरिता पाल आणि छत्री उभारण्यात आली आहे. छत्रीचे टोक  डोक्याला किंवा कदाचित डोळ्यात खुपसू शकते. व्यवसाय करण्याला विरोध नाही; पण रस्ता गिळंकृत करण्याचा अधिकार कुणी दिला. रस्ता सर्वसामान्य रहदारीचा आहे तो मोकळा करून देणे, ही प्रशासनाची तितकीच नैतिक जबाबदारी असून, यावर बोलण्यापेक्षा जप्तीची कारवाई केली पाहिजे, अशी नागरिकांची मागणी आहे.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण