शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

शेतकरीच करणार पारंपरिक धान बियाणांची लागवड

By admin | Published: June 17, 2016 12:45 AM

२०१७-१८ या खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांना पारंपारीक धान्य बियाणे उपलब्ध व्हावे, संवर्धन व संरक्षणाकरिता...

सुधीर धकाते : खरीप हंगामाकरिता ४५ शेतकरी प्रशिक्षितभंडारा : २०१७-१८ या खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांना पारंपारीक धान्य बियाणे उपलब्ध व्हावे, संवर्धन व संरक्षणाकरिता ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाने यावर्षी चार एकरच्या धानांचा शेतकऱ्यांना पुरवठा करून १५००० क्विंटल बियाणे भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यामधील ६ तालुक्यात शेतकरीच बियाणे शुद्धीकरण व लागवड करून बियाणाची निर्मिती करणार आहेत.पूर्व विदर्भ धान शेतीच्या वैशिष्ट्याचा वारसा व भांडार समजला जात होता. नावाजलेल्या पारंपारिक धानाच्या अनेक जाती यात लुचई, लुडका, दुबराज, हीरानक्की, चिन्नोर, काडीकमो, बासबिर्रा नावारुपाला आणणारा विभाग. काळाच्या ओघात या जाती दुर्मिळ होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. परीणामी शेतकरी बियाणामध्ये परावलंबी झाला याचा प्रचिती कृषी जैवविविधतेवर पडली. या बदलाला रोकण्यासाठी महाराष्ट्र पातळीवर ‘राजीव गांधी तंत्रज्ञान आयोगाच्या’ सहकार्याने ‘महाराष्ट्र जनूक कोष कार्यक्रम’ ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाद्वारे ‘कृषी जैवविविधत संवर्धनाचे’’ कार्य सुरु झाले. प्रकल्पा अंतर्गत ५ वर्षात भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यात कृषी जैवविविधतेचा शोध घेवून शेतकऱ्याद्वारे बियाणाचे शुद्धीकरण करणे, वैज्ञानिक पद्धतीने विश्लेषण, पोषक घटकाचा अभ्यास, लोकसहभागातून पारंपारिक बियाणे बँकेची निर्मिती, बियाणाचा विस्तार दुर्मिळ वाणाचे जैवविविधता नोंदवून राष्ट्रीय जनुक कोष मध्ये नोंदणी करणे हे उद्दिष्टये आहे. यावर्षीच्या हंगामासाठी साकोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी व मोरगाव अर्जुनी, चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड व ब्रम्हपुरी तालुक्यातील ४५ गावातील शेतकरी गटप्रमुखाची निवड करण्यात आली. ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाच्या प्रशिक्षण सभागृहात बीज संवर्धन शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणाचे मुख्य प्रशिक्षक व महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्पाचे समन्यवक सुधीर धकाते व ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे सचिव अविल बोरकर यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षणामध्ये बियाणे शुद्धीकरणाचे टप्पे, बियाणे लागवड पद्धती शेतकऱ्यांनी समजून घेतली. प्रत्येक गावात ६ शेतकऱ्यांची निवड होईल. ७५ एकरामध्ये २५० शेतकऱ्यांची निवड करून शास्त्रीय पद्धतीने बियाणाची लागवड करून घेण्याची जबाबदारी गटप्रमुखानी स्वीकारली. पुढील हंगामाकरिता बियाणे निर्मिती करून २५ बिज बॅक प्रत्येक गावामध्ये स्थापन करण्याचे ठरविण्यात आले. सदर कार्यक्रम देखरेख प्रक्रिया व व्यवस्थापन प्रक्रिया संक्षम करण्याची जबाबदारी देवेंद्र राऊत (मोरगाव अर्जुनी), ज्ञानेश्वर बनकर (साकोली), भदुजी कायते (भंडारा), छत्रपती बघमारे (ब्रम्हपुरी) यांच्याकडे सोपविण्यात आली असून प्रशिक्षण यशस्वी होण्यास यांचे योगदान मिळाले. सदर उपक्रमामुळे स्थानिक जातीे पिकांचे संवर्धन व संरक्षण होण्यास मदत होईल. तसेच पोषमुल्य असलेले अन्न ग्राहकांना उपलब्ध होतील व दुर्मीळ बियाणावर शेतकऱ्यांचे हक्क प्रस्तापित होण्यासाठी मदत होईल. (नगर प्रतिनिधी)