शेतकऱ्यांनो, फवारणी करताना काळजी घ्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 22:30 IST2018-09-03T22:29:52+5:302018-09-03T22:30:32+5:30
जिल्ह्यासह विदर्भात फवारणीच्या विषबाधेने अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला तर शेकडो शेतकऱ्यांना विषबाधा झाली. गत काही वर्षापासून विषबाधेच्या प्रकारात वाढ झाल्याने शेतकºयांसोबतच मजुरही हादले आहे. शेतात फवारणी करण्यासाठी मजुर मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आणि शेतमजुरांनी फवारणी करताना काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. त्यासाठी विविध उपाययोजना सुचविल्या आहेत.

शेतकऱ्यांनो, फवारणी करताना काळजी घ्या !
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यासह विदर्भात फवारणीच्या विषबाधेने अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला तर शेकडो शेतकऱ्यांना विषबाधा झाली. गत काही वर्षापासून विषबाधेच्या प्रकारात वाढ झाल्याने शेतकºयांसोबतच मजुरही हादले आहे. शेतात फवारणी करण्यासाठी मजुर मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आणि शेतमजुरांनी फवारणी करताना काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. त्यासाठी विविध उपाययोजना सुचविल्या आहेत.
पिकांवरील किडींच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना किटकनाशकांची फवारणी करावी लागते. अनेक शेतकरी कीड लवकर नियंत्रणात यावी यासाठी अतिजहाल किटकनाशके फवारतात. त्यातून विषबाधेचे प्रमाण गत काही वर्षापासून वाढल्या आहेत. विदर्भातील सर्वच जिल्ह्यामध्ये विषबाधेचे रुग्ण आढळून आले. गतवर्षी अनेक शेतकºयांना आपला जीव गमवावा लागला.
यानंतर वरिष्ठ पातळीवर खळबळ उडाली. शेतकºयांनी फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यता आले. मात्र त्यानंतरही विषबाधेच्या घटना भंडारासह विदर्भात घडत आहेत. त्यामुळे आता राज्य शासनाने विशेष परिपत्रक काढून फवारणीसाठी कोणत्या उपाययोजना कराव्या आणि कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले आहे.
फवारणीसाठी स्वतंत्र पंप वापरावा. साधनातील औषधी पुर्णपणे निघून गेली आहे याची खात्री करावी. किटकनाशकाचे रिकामे डब्बे नष्ट करावे, वाºयाचा वेग कमी असताना फवारणी करावी, फवारणीसाठी स्वतंत्र पोषाख व बुट वापरावा, फवारणी करताना समानवेगाने चालावे.
शक्यतो हातमोचे, चष्मा व मास्क वापरावा. इतर कामासाठी वापरताना साबनाने दोन-तीन वेळा हात धुवावे आणि महत्वाचे म्हणजे किटकनाशके फवारण्यापुर्वी दिलेल्या माहिती पत्रकाचे वाचन करून त्यानुसार त्याचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
किटकनाशकात विषाचे प्रमाण किती आहे हे किटकनाशकाच्या डब्यावर नोंदविले असते. त्याचीही खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी फवारणी करताना योग्य काळजी घेतल्यास विषबाधेच्या घटनेला आळा बसू शकतो. शेतकऱ्यांनी या सुचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन भंडारा पंचायत समितीचे कृषी अधिकारी व्ही.एम. चौधरी यांनी केले आहे. शेतकºयात जनजागृती करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनीही स्वत: काळजी घेतल्यास असे प्रकार टाळले जाऊ शकतात.
फवारणी करताना दक्षता महत्वाची
फवारणी करताना शेतकरी आणि शेतमजुरांनी दक्षता घेण्याची गरज आहे. खाद्य पदार्थ व इतर औषधी लहान मुलांच्या संपर्कात येवू देवू नये, फवारणी करताना बिडी, सिगारेट, तंबाखूपान करू नये. हाता-पायावर जखम असलेल्या व्यक्तीची फवारणीसाठी निवड करू नये, मुदत संपलेली किटकनाशके वापरू नये, फवारणीच्या गळक्या साधनांचा वापर करू नये आणि महत्वाचे म्हणजे किटकनाशक खतांमध्ये शिफारशीशिवाय मिसळू नये या दक्षता घेतल्यास विषबाधेला पायबंद बसू शकते.