कर्जबाजाराला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

By Admin | Updated: January 9, 2016 00:56 IST2016-01-09T00:56:29+5:302016-01-09T00:56:29+5:30

पवनारा येथील एका अविवाहित शेतकऱ्याने कर्ज, व नापिकीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली.

Farmer's Suicide Suffering From Debt Market | कर्जबाजाराला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजाराला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या


तुमसर : पवनारा येथील एका अविवाहित शेतकऱ्याने कर्ज, व नापिकीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवाजी रोशन खेडकर (२५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना ५ जानेवारी रोजी घडली.
शिवाजीची आई रेखा यांच्या नावावर पवनारा येथे पावने दोन एकर शेती आहे. सन २०१३ मध्ये रेखा आई यांनी सेवा सहकारी सोसायटीकडून २९ हजाराचा कर्ज घेतला होता. नापीकीमुळे कर्जाची परतफेड करता आली नाही. २९ हजाराच्या कर्जावर १० हजाराचा व्याज झाला. ४० हजार १४८ रुपयांचा कर्जाचा डोंगर झाला. ही रक्कम परत कशी करायची असा प्रश्न खेडकर कुटुंबीयांना पडला. आर्थिक विंवचनेत शिवाजीने ५ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास बहिनीच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
चार भाऊ एक बहिण हा आई असा परिवार आहे. यावर्षी शिवाजी व त्याची बहिन प्रतिभाचे लग्न ठरले होते. तहसीलदार डी. टी. सोनवाने यांनी तलाठ्याकडून अहवाल मागितला. शिवाजी हा पवनारा येथे उदरनिर्वाहाकरिता कपडे ईस्त्री करण्याचे काम करीत होता. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Farmer's Suicide Suffering From Debt Market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.