शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
4
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
5
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
6
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
7
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
8
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
9
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
10
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

वीज देयकामुळे शेतकरी त्रस्त

By admin | Updated: November 23, 2014 23:14 IST

एकीकडे भारनियमाने सर्वत्र कहर तर दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी विज बिल भरले नाही त्या शेतकऱ्याचे कृषि पंपावरील विज कापण्याचा सपाटा सुरु केला आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष दयावे,

पालोरा : एकीकडे भारनियमाने सर्वत्र कहर तर दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी विज बिल भरले नाही त्या शेतकऱ्याचे कृषि पंपावरील विज कापण्याचा सपाटा सुरु केला आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष दयावे, अन्यथा आझाद शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा संघटनेचे अध्यक्ष किशोर पंचभाई व अन्य शेतकऱ्यांनी दिला आहे, या संदर्भात अभियंताना निवेदन दिले आहे.शेतकऱ्यांनी वेळेवर वीज देयक भरावे, म्हणून विज वितरण कंपनीकडून विविध योजना राबविल्या जात आहे. यात कृषी संजिवनी योजना ही शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. जे शेतकरी थकीतधारक आहे. त्यांनी कृषी संजिवनीचा लाभ घेवून रितसर विद्युत पुरवठा सुरु ठेवावा ,म्हणून विज कंपनीकडून गाजावाजा करुन ही योजना सुरु केली. या योजनेचे शेतकऱ्यांनी स्वागत केले होते. मात्र हिच कृषि संजीवनी योजना शेतकऱ्यांसाठी फसवी ठरली आहे. जे शेतकरी विज देयकापासून थकीत होते. त्यांनी कृषी संजीवनीचा लाभ मिळविण्याकरिता कर्ज काढून विज बिल भरले होते. ज्या शेतकऱ्यांनी बिल भरले त्यांच्या विज देयकात बिल लागून आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. पवनी येथील विज कार्यालयात दररोज शेकडो शेतकरी विज देयक घेवून येत आहे. धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. यावर्षी पवनी तालुक्यात कोरडा दुष्काळ पडला आहे. अल्प पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही. धानाला शेवटच्या एका पाण्याची गरज होती. मात्र पाणी न आल्यामुळे सर्वत्र कोरडा दुष्काळ पडला आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून विज देयक भरल होते. मात्र विज देयक लागुन आल्यामुळे बिल कमी करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे. कृषी संजीवनी लाभ शेतकऱ्यांना मिळणार किंवा नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. (वार्ताहर)