लोकमत न्यूज नेटवर्कखरबी (नाका) : भंडारा तालुक्यातील खरबी (नाका) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन अध्यक्ष अनिल बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. या सभेला गावातील एकुण १४० शेतकरी सभासद उपस्थित होते.या सभेमध्ये शेतकऱ्यांसमोर मागील वार्षिक वर्षीचा अहवाल वाचून दाखविण्यात आला. सर्वप्रथम इस्तारी बोरकर यांना श्रद्धांजली वाहून सभेची सुरुवात करण्यात आली. २०१९ - २०२० अंदाज पत्रक मंजूर करणे, ऑडीट करण्याकरितभा ऑडीटरची नेमणूक करणे, कर्जाची मर्यादा वाढविणे, थकीत कर्जाची माहिती इत्यादीची माहिती दिली.यावर्षी पंतप्रधान पीक विमा योजनेच्या लाभ सोसायटीमार्फत ८७ शेतकऱ्यांना झाला. चालू वर्षात या संस्थेच्या ७ लाख २३ हजार १०१ रुपये संस्थेत जमा असून या नफ्यातूनच शेतकरी सभासदांना पाण्याचे कॅन व डिनर शेडचे १५२ सदस्यांना वाटप करण्यात आले. अशा प्रकारचे वाटप करणारी भंडारा तालुक्यातील एकमेव शेतकरी सोसायटी असल्यो सोसायटीेचे अध्यक्ष अनिल बोरकर यांनी सांगितले.कार्यक्रमाचे संचालन सचिव भालाधरे यांनी केले. आभार अनिल बोरकर यांनी केले. सभेसाठी उपाध्यक्ष उषा शंकर धांडे, संजय आंभुरे यांनी सहकार्य केले.
खरबी येथे शेतकऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 22:13 IST
सभेमध्ये शेतकऱ्यांसमोर मागील वार्षिक वर्षीचा अहवाल वाचून दाखविण्यात आला. सर्वप्रथम इस्तारी बोरकर यांना श्रद्धांजली वाहून सभेची सुरुवात करण्यात आली. २०१९ - २०२० अंदाज पत्रक मंजूर करणे, ऑडीट करण्याकरितभा ऑडीटरची नेमणूक करणे, कर्जाची मर्यादा वाढविणे, थकीत कर्जाची माहिती इत्यादीची माहिती दिली.
खरबी येथे शेतकऱ्यांचा सत्कार
ठळक मुद्देसाहित्यांचे वाटप : विविध कार्यकारी सहकारी संस्थेचा उपक्रम