शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

धान मोजणीसाठी शेतकऱ्यांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:00 IST

धान खरेदी केंद्र चालू होऊन चार महिने लोटले असले तरी अद्याप ५० टक्के धानाची मोजणी पूर्ण होण्यास आहे. ती मोजणी ताबडतोब करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी दिघोरीतील शेतकरी धान खरेदी केंद्रासमोरच उपोषणाला बसले आहेत.

ठळक मुद्देदिघोरी येथील प्रकार : दोन महिन्यांपासून धान खरेदी बंद, शासन प्रशासनच्या दुर्लक्षाने शेतकरी संकटात

मुकेश देशमुख।
लोकमत न्यूज नेटवर्क
दिघोरी (मोठी) : येथील आधारभूत धान खरेदी केंद्र गत दोन महिन्यांपासून बंद आहे. महिन्याला आठ ते दहा दिवस धानाची मोजणी सुरु राहत आहे. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांचे हजारो धानाचे पोती उघड्यावर पडून आहेत. धान खरेदी केंद्र चालू होऊन चार महिने लोटले असले तरी अद्याप ५० टक्के धानाची मोजणी पूर्ण होण्यास आहे. ती मोजणी ताबडतोब करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी दिघोरीतील शेतकरी धान खरेदी केंद्रासमोरच उपोषणाला बसले आहेत.
खरेदी विक्री संघाद्वारे दरवर्षी दिघोरीत आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु असते. यावर्षीसुद्धा मोठ्या थाटामाटात धान खरेदी केंद्र नोव्हेंबर महिन्यात सुरु झाले. मात्र फेब्रुवारी महिना अर्धा संपला असला तरी अजूनपर्यंत जवळपास १५ हजार क्विंटल धानाची मोजणी शिल्लक आहे. याच धान खरेदी केंद्रावर गतवर्षीच्या आकडेवारीची तुलना केल्यास १० फेब्रुवारी २०१९ पर्यंत सर्वच्या सर्व म्हणजे २७ हजार क्विंटल धानाची मोजणी पूर्ण झालेली होती. मात्र यावर्षी आजपर्यंत केवळ १८ हजार क्विंटल धानाची खरेदी झालेली आहे. म्हणजे जवळपास नऊ हजार क्विंटल धान गतवर्षीच्या तुलनेत कमी खरेदी करण्यात आले. यावर्षी शासनाने ७०० रुपये बोनस जाहीर केल्यामुळे सर्व शेतकऱ्यानी धान खरेदी केंद्रावरच विक्रीसाठी आणले. खाजगी व्यापारी व शासकीय धान खरेदी केंद्राच्या दराची तुलनात्मकदृष्ट्या जवळपास प्रती क्विंटल एक हजार रुपये रुपये फरक पडत असल्याची जाणीव शासन आणि प्रशासनाला परिपूर्ण असतानाही बारदाना व डीओची व्यवस्था केली नाही. त्यामुळे आजपर्यंत शेतकºयांना धान मोजणीसाठी विलंब झाला. अवकाळी पाऊस पडत असल्याने धान खरेदी केंद्राबाहेर असलेले हजारो पोती धान खराब झाले आहेत. शासनाने खराब झालेला धान आहे त्या अवस्थेत खरेदी करावा, विनाविलंब धानाची मोजणी सुरळीत चालू करावी. बारदाना व डीओची अडचण दाखवून शेतकºयांना फसवू नये अशा विविध मागण्यांसाठी अविनाश ब्राम्हणकर, अरुण गभणे, गुलाब कापसे, मुखरु कापसे, पद्माकर चेटुले, खुशाल निनावे, डाकराम चेटुले, संदीप पुरामे, महादेव कांबळे, रवींद्र हटवार, मार्कंड हुकरे, रामचंद हुकरे, सोपान भेंडारकर, विलास कोरे, तुलाराम फुंडे, सुरेश देशमुख, रोशन नंदेश्वर उपोषणाला बसले आहेत.

यावर्षी धानाची आवक वाढल्याने धान खरेदीसाठी लागणाºया साहित्यांचा अभाव पडला. अन्न पुरवठा अधिकाऱ्यानी तांदळाची विल्हेवाट न लावल्याने डीओ देण्यास अडचण निर्माण झाली. लगेच सर्व बाबींची दखल घेऊन सलग धान मोजणीसाठी प्रयत्न करणार आहे.
-सी.डी. खाडे, जिल्हा पणन अधिकारी, भंडारा.
आजपर्यंत शेतकऱ्याला खूप त्रास सहन करावा लागला. दिघोरीला उपोषाला सुरुवात झाली असली तरी जिल्ह्याभरातून यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारपासून लाखांदूर तालुका व जिल्ह्यात ठिकठिकाणी धान खरेदी केंद्रासमोर उपोषणास सुरुवात होईल. शासन व प्रशासनाने उपोषणाची व शेतकऱ्याला होणाऱ्या त्रासाची दखल घेत अखंडपणे धानाची मोजणी करावी.
-अविनाश ब्राम्हणकर, माजी सदस्य, जिल्हा परिषद, भंडारा

टॅग्स :Farmerशेतकरी