शेतकरी मागणारा नाही तर देणारा आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 00:41 IST2018-11-09T00:40:11+5:302018-11-09T00:41:03+5:30
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तो राबराब राबून धान पिकवतो व स्वत:पेक्षा इतरांना खाऊ घालतो. मात्र निसर्गाची अवकृपा व शासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना वाईट दिवस आले आहेत. सततची नापिकी, वाढते कर्ज यामुळे शेतकºयांना कर्जमाफीची गरज आहे.

शेतकरी मागणारा नाही तर देणारा आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तो राबराब राबून धान पिकवतो व स्वत:पेक्षा इतरांना खाऊ घालतो. मात्र निसर्गाची अवकृपा व शासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना वाईट दिवस आले आहेत. सततची नापिकी, वाढते कर्ज यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे. अन्यथा शेतकरी देणारी जात आहे, मागणारी जात नाही. शेतपिकाला जर चांगला भाव मिळाला तर शेतकऱ्यांला मागायचीही गरज पडणार नाही. शेतकरी स्वाभिमानी आहे, लाचार नाही, असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस शेतकरी शेतमजुर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
जनहित सामाजिक सेवाभावी संस्था भंडाराच्या वतीने कुंभली येथे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना व संजय गांधी योजनाच्या लाभार्थ्यांना ब्लँकेट वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार आनंदराव वंजारी होते. प्रमुख अतिथी म्हणून खासदार मधुकर कुकडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते, जि.प. सरपंच आकाश कोरे, माजी सभापती मदन रामटेके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हेमकृष्ण वाडीभस्मे, देवरीचे प्राचार्य अरुण झिंगरे, जिल्हा दुग्ध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी, उमेद गोडसे, तालुका अध्यक्ष अंगराज समरीत, सरपंच कमल भेंडारकर, भरत खंडाईत, अंताराम खोटेले, ज्योत्सना घोरमारे, जया भुरे, नरेंद्र बुरडे, लता दुरूगकर, पं.स. सदस्य लखन बर्वे, नगरसेवक अनिल निर्वाण, विनोद भुते, सत्यवान हुकरे, प्रदीप मासुरकर उपस्थित होते.
नाना पटोले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी करून काळा धन आणू असे सांगितले होते. मात्र वर्षाचा कालावधी लोटला तरी एकही काळा धन देशात आला नाही. उलट लहान मोठे व्यवसाय बंद झाले. नोकर भरती बंद झाली. युरीयाची बॅग पूर्वी ५० किलोची होती ती आता त्याच किंमतीत ४५ किलोची झाली. धानाला उत्पादन खर्चाच्या दुप्पट भाव देऊ अशी घोषणा केली होती. मात्र धानाला भाव मिळाला नाही. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. दोन वर्षाचा कालावधी लोटला तरी अजुनपर्यंत कर्जमाफी झाली नाही. यावर्षी दुष्काळाची परिस्थिती असतानाही आजपर्यंत दुष्काळाची व कर्जमाफीची घोषणा झाली नाही. शेतकºयांनी आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान देऊन बरेच दिवस झाले तरी धानाचे चुकारे मिळाले नाही. भाजप सरकार शेतकरी विरोधी झाले, असा आरोपही पटोले यांनी यावेळी केला.
प्रास्ताविक के.वाय. नान्हे यांनी केले.
यावेळी त्यांनी जनहित सेवाभावी संस्था भंडारातर्फे दोन वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेतला. तसेच स्वर्गीय डॉ. बाबुराव फुंडे यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांच्या समजाकार्याची माहिती विषद केली. यावेळी कुंभली जिल्हा परिषद क्षेत्रातील श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना व संजय गांधी अनुदान योजनेच्या एकूण २१० लाभार्थ्यांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
संचालन व आभार प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रसचे जिल्हा महासचिव प्रभाकर सपाटे यांनी केले. कार्यक्रमाला रवि राऊत, सुरेश बघेल, अनिल टेंभरे, निलेश घरडे, यशपाल कºहाडे, प्रविण भांडारकर, अखिलेश गुप्ता व गावकरी उपस्थित होते.