विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : पवनी तालुक्यात गत दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उन्हाळी धानपिकाची कापणी व मळणी धोक्यात आली आहे. तर दुसरीकडे खरीप हंगामाच्या तयारीला शेतकरी लागला आहे. त्यामुळे शेतकरी द्विधा मनस्थितीत अडकला असून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.निसर्गाचा लहरीपणामुळे उन्हाळी धानपीक घेणाऱ्या उत्पादकांची चिंतेत भर झाली आहे. धानपीक परिपक्व न होताच धानाची कापणी केली जात आहे. त्यानंतर लगेच मळणीदेखील केली जात आहे. मळणीनंतर धान वाळविण्यासाठी शेतकऱ्यांकडे पर्यायी जागा उपलब्ध नाही. नाईलाजास्तव शेतकरी मिळेल त्या जागेवर धान वाळवत आहेत. त्या धानाला दिवसातून पाच ते सहा वेळा उलटणी करण्यासाठी घरातील आबालवृध्द या कामात व्यस्त दिसून येत आहे. अड्याळ येथून महामार्गाचे बांधकाम सुरु आहे. या मार्गावरुन वाहनाची वर्दळ मंदावली आहे. याचाच फायदा आता शेतकरी धानपीक वाळविण्यासाठी करताना दिसत आहे.पवनी तालुक्यातील शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे उन्हाळी धानपीक व खरीप हंगामाच्या कात्रीत अडकला आहे. उन्हाळी पिकावर पाऊस कोसळल्याने धानपीक धोक्यात आले आहे. धान कापणीसाठी आधुनिक यंत्राच्या सहायाने कापणी करुन लगेचच मळणी देखील केली जात आहे. त्यानंतर धानपीक वाळविण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग दिसून येते. पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाळविलेले धानपीक केव्हाही भिजण्याची शक्यता आहे. त्यासाठी घाम गाळून शेतकरी पीक वाळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे उन्हाळी हंगाम आटोपताच खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी आटापिटा करतांना दिसत आहेत. एकंदरीत हातचे पीक जावू नये यासाठी शेतकरी कुटुंबिय काटकसर करीत असले तरी हवामान खात्याच्या सतर्कतेच्या इशाºयाने निसर्गचा लहरीपणा शेतकºयाच्या पत्थ्यावर पडण्याची दाट भीती आहे.उन्हाळी धानाची कमी दरात विक्रीपवनी तालुका हा चौरास भाग म्हणून प्रसिध्द आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानपिकाची लागवड केली जाते. धानाची कापणी व मळणी अंतीम टप्प्यात आहे. धान विक्रीसाठी शेतकरी व्यापाऱ्यांकडे धाव घेऊन पडक्या दरात धान विकत आहेत. पवनी तालुक्यात धान खरेदी केंद्र सुरु करण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आक्रोश आहे.
शेतकरी सापडला द्विधा मनस्थितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 05:01 IST
निसर्गाचा लहरीपणामुळे उन्हाळी धानपीक घेणाऱ्या उत्पादकांची चिंतेत भर झाली आहे. धानपीक परिपक्व न होताच धानाची कापणी केली जात आहे. त्यानंतर लगेच मळणीदेखील केली जात आहे. मळणीनंतर धान वाळविण्यासाठी शेतकऱ्यांकडे पर्यायी जागा उपलब्ध नाही. नाईलाजास्तव शेतकरी मिळेल त्या जागेवर धान वाळवत आहेत. त्या धानाला दिवसातून पाच ते सहा वेळा उलटणी करण्यासाठी घरातील आबालवृध्द या कामात व्यस्त दिसून येत आहे.
शेतकरी सापडला द्विधा मनस्थितीत
ठळक मुद्देनिसर्गाचा लहरीपणा : उन्हाळी धान कापणी, मळणीसह खरीप हंगामाची लगबग