ताणतणावाचे व्यवस्थापन करण्याचे तज्ज्ञांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:34 IST2021-05-17T04:34:05+5:302021-05-17T04:34:05+5:30
रुग्णाला जेव्हा सर्वप्रथम कळते की त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे तेव्हा त्याच्या मनात भीती, घबराट, ताण-तणाव, चिंता निर्माण ...

ताणतणावाचे व्यवस्थापन करण्याचे तज्ज्ञांचे आवाहन
रुग्णाला जेव्हा सर्वप्रथम कळते की त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे तेव्हा त्याच्या मनात भीती, घबराट, ताण-तणाव, चिंता निर्माण होते. रक्तदाब वाढणे, डोकेदुखी, थकवा, रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी होणे, ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणे इत्यादी बाबी रुग्णांमध्ये दिसण्यास सुरुवात होते.
रुग्णांची शारीरिक व मानसिक स्थिती ढासळण्यास सुरुवात होते. रुग्ण औषधोपचारांना प्रतिसाद देत नाही आणि प्रसंगी त्याचा मृत्यूसुद्धा होत असतो. सांगायचा मुद्दा हाच की, कोरोना ही एक जागतिक महामारी आहे. आपण तिला मात देऊन जीवन पुन्हा नव्याने आनंदाने सुखाने जगू शकतो. मात्र आपण सर्वांनी तिचा इतका धसका घेतला आहे की, ज्यामुळे आपल्या मनावर त्याचा मोठा मानसिक परिणाम झाला आहे. कोरोनाला घाबरण्यापेक्षा काळजी घ्यावी.