शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

खर्चिक विवाह सोहळ्यांनी वाढतोय कर्जाचा डोंगर !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2024 2:16 PM

Bhandara : ग्रामीण भागातही होतोय वारेमाप खर्च; महागाईने वर-वधू पिता त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क किटाडी : सध्या स्थितीत सर्वत्र लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. आता शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातही खर्चिक विवाह सोहळ्यांना ऊत आल्याचे चित्र आहे. दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळेलग्न - साहित्याच्या किमतीही गगनाला भिडल्या असून, सोन्या-चांदीच्या दागिन्यांवरही महागाईचे सावट आहे.

ग्रामीण भागात शेतमजूर कुटुंबांना आपल्या मुला-मुलींच्या लग्नासाठी दोन पैसे गाठीला जोडावे लागतात; परंतु वाढत चाललेल्या महागाईमुळे, लग्नसोहळ्यातील वाढलेल्या खर्चामुळे अनेकांना कर्जबाजारी व्हावे लागत आहे. पूर्वी ग्रामीण भागातील विवाह सोहळे कमी खर्चात साध्यासुध्या पद्धतीने पार पाडले जात होते; परंतु हल्ली ग्रामीण भागातही शहरी थाटामाटाची संस्कृती रूढ होत चालली आहे. लग्नसोहळ्यात मेहंदी, हळद, पाहुण्यांचा पाहुणचार, कपडे, स्वागत समारंभ, भेटवस्तू, -म्युझिकल बँडबाजा, डीजे, लाइटिंग, - मोठी एलईडी स्क्रीन व शेवटी मांडव वाढवणी आदी कार्यक्रमांसह खर्चाची यादी वाढली आहे.

याशिवाय घोडा, केटरर्स, फेटे, फ्लावर डेकोरेशन, व्हिडीओग्राफी, फोटोग्राफी, ड्रोन कॅमेरा, शूटिंग खर्च एकूण गोळाबेरीज केली तर खर्च लाखोंच्या घरात जातो. त्यामुळे ते थाटामाटात आणि अगदी वाजत- गाजतच वेगळ्या पद्धतीने झाले पाहिजे, असा आताच्या तरुण पिढीचा आग्रह घरच्यांसमोर असतो. त्यामुळे सर्वसाधारण घरातील लग्नाचे बजेट वाढत चालले आहे. शहरात होणाऱ्या महागड्या लग्नासारखी लग्न अलीकडे ग्रामीण भागातही व्हायला सुरुवात झाली आहे. परिणामी, आई-वडिलांच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर वाढत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

सामूहिक विवाह सोहळे काळाची गरजअलीकडे अनेक धार्मिक, सामाजिक संस्था सामाजिक बांधिलकीतून सामूहिक विवाह सोहळ्याच्या आयोजन करतात. सर्वांचा खर्च, वेळ, पैसा व श्रम यांची तर बचत होतेच. शिवाय, सामाजिक संस्थांकडून विवाहित जोडप्यांना संसाराकरिता आवश्यक साहित्यही दिले जाते. गोरगरीब, शेतकरी व सर्वसाधारण पालकांना सामूहिक विवाह सोहळ्यामुळे मोठी मदत होते. आर्थिक कर्जबाजारीपणातून वाचण्यासाठी सामूहिक विवाह सोहळ्याला पसंती देणे, हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

अनावश्यक खर्चाला फाटा द्यावादुष्काळी स्थितीतही ग्रामीण भागात लग्नसमारंभातील मिजास कायम असल्याचे दिसून येते. प्रसंगी कर्जबाजारी होऊन वर-वधू पिता धुमधडाक्यात विवाह सोहळा साजरे करीत असल्याचे दिसते. लग्नातील हा अनावश्यक खर्च टाळण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे. शेवटी लग्न दोन जीव व दोन कुटुंबाचे मिलन असते. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळून काही पैसा भावी दाम्पत्याच्या भविष्यासाठी राखून ठेवणे, अधिक सोयिस्कर ठरू शकेल. 

टॅग्स :marriageलग्नbhandara-acभंडाराInflationमहागाई