शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्ष, उपाध्यक्षासह संचालक निष्कासित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 05:01 IST

सदर संस्थचे अध्यक्ष व व्यवस्थापक यांनी ऑक्टोबर व नोव्हेंबर २०१९ मासिक सभेच्या ठरावाची सत्यप्रत अध्यक्ष आशा ठाकरे यांनी असे अर्ज व्यवस्थापक, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना २८ नोव्हेंबर २०१९ केले होते. आजपावेतो संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व एका संचालिकाला विश्वासात न घेता परस्पर निष्कासीत केल्याचे दिसून आले आहे.

ठळक मुद्देलाखांदूर येथील स्वामी माधवानंद सहकारी संस्था : थकीत कर्जाचा ठपका, व्यवस्थापक व संचालकांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : येथील स्वामी माधवानंद सहकारी संस्थेचे थकीत कर्ज असल्याने संस्थेच्या व्यवस्थापक व संचालकांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष व एका संचालिकेला निष्कासित केले आहे.
सदर संस्थचे अध्यक्ष व व्यवस्थापक यांनी ऑक्टोबर व नोव्हेंबर २०१९ मासिक सभेच्या ठरावाची सत्यप्रत अध्यक्ष आशा ठाकरे यांनी असे अर्ज व्यवस्थापक, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना २८ नोव्हेंबर २०१९ केले होते. आजपावेतो संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व एका संचालिकाला विश्वासात न घेता परस्पर निष्कासीत केल्याचे दिसून आले आहे. तालुक्यातील स्वामी माधवानंद सहकारी संस्था लाखांदूर च्या अध्यक्षा आशा जागेश्वर ठाकरे यांच्या पतिकडे २३ एप्रिल २०१५ रोजी घेतलेले कर्ज १२ लक्ष रुपयांचे आहे, तर उपाध्यक्ष रजनी रामेश्वर ठाकरे यांच्या पतीचे नावे १८ जून २०१५ ला सहा लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. संचालिका संगीता हरिदास ठाकरे यांनी ९ डिसेंबर २०१३ रोजी एक लाख १५ हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे. मात्र कुठल्याही प्रकारची नोटीस किंवा कर्ज मागणी संचालक व व्यवस्थापकाकडून करण्यात आलेली नाही. मात्र तीघांनाही परस्पर पदावरून पायउतार केल्याचे दिसून येत आहे.
संस्थेचे नित्यनिधी अभिकर्ते यांना संस्थेतून कर्ज दिला गेला आहे. याकडे व्यवस्थापक व सहाय्यक निबंधक लक्ष देत नाही. त्याचबरोबर या संस्थेत अनेक आर.डी. एजंट नेमलले आहेत. त्यांच्यावर आजपावेतो २५ हजार रुपयांची अमानत रक्कम घेणे आहे. सध्यास्थितीत संचालक म्हणून कार्यरत असल्याचे जागेश्वर ठाकरे यांनी सांगितले. जवळपास ७० लाख रुपये इमारत बांधकामासाठी रक्कम संस्थेत जमा आहे. असलेल्या रकमेपासून संस्थेचे संचालक यांचे पती यांनी या रकमेतून २.५० लाख रुपयांची मागणी केली. संस्थेची लूट करण्याचे कारस्थान करीत असल्याची धक्कादायक माहिती संस्थेचे जागेश्वर ठाकरे यांनी माहिती दिली आहे. आशा जागेश्वर ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार २८ आॅक्टोबर २०१९ रोजी मासिक सभेचे नोटीस सहीनुसार काढण्यात आले आहे. मात्र त्या तारखेपासून दोन महिने विचारात न घेता, नोटीस न देता सभा घेण्यात आली. याबाबत विचारणा केली गेली नाही. असलेला कर्ज कधीही भरण्यास तयार आहोत. पण कोणतीही मागणी नोटीस न येता काढण्यात आले आहे.
बँकेकडून थकीत कर्जदार असलेल्या संचालकांना मागणी नोटीस न देता परस्पर पदावरून निष्कासीत करण्यात आले आहे. त्याचबरोबर नव्याने रुजू झालेले अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची २३ जानेवारी निवड केल्याचे दिसून येत आहे. संस्थेत मोठा घोळ असल्याचे दिसून येत असून जिल्हा उपनिबंधक यांनी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी माजी अध्यक्ष आशा ठाकरे, माजी उपाध्यक्ष यांनी केली आहे.

पाच वर्षापासून कोणतीही नोटीस अथवा आरआरसी न करता मला व माझ्या पत्नीला पदावरून निष्कासित करण्यात आले आहे. आम्ही कधीही संस्थेचे कर्ज भरण्यास तयार आहोत. याबाबत संबंधित विभागाने चौकशी करून कार्यवाही करावी.
-जागेश्वर ठाकरे, माजी संचालक
संस्थेचे अभिकर्ते सुधाकर वझाडे यांनी संबंधित माहिती दिली आहे. नेमका काय प्रकार आहे, याची माहिती घेतली जाईल. संस्थेचे हित जोपासण्याचा पुरेपुर प्रयत्न केला जाईल.
-भूषण काळबांधे, व्यवस्थापक.

टॅग्स :Socialसामाजिक