शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकाला राजत्व प्राप्त करून देण्यासाठी चळवळ विस्तारित करावी

By admin | Updated: November 20, 2014 22:47 IST

ग्राहक हा राजा आहे आणि त्याला राजत्व प्राप्त करून देण्यासाठी शासकीय यंत्रणेतील त्रृटी दूर करण्यासाठी ग्राहकशक्ती, दंड आणि लोकप्रतिनिधींचे सहकार्यानेच ग्राहक चळवळ विस्तारित करता येईल,

भंडारा : ग्राहक हा राजा आहे आणि त्याला राजत्व प्राप्त करून देण्यासाठी शासकीय यंत्रणेतील त्रृटी दूर करण्यासाठी ग्राहकशक्ती, दंड आणि लोकप्रतिनिधींचे सहकार्यानेच ग्राहक चळवळ विस्तारित करता येईल, असे प्रतिपादन राज्याचे ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष सूर्यकांत गवळी यांनी केले.ग्राहक चळवळ ग्रामीण भागात पोहचविण्यासाठी तसेच जिल्ह्यातील ग्राहकांच्या तक्रारी समजून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष सुर्यकांत गवळी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड, बी.के. आरीकर, स्मिता नार्टन उपस्थित होत्या.यावेळी सुर्यकांत गवळी यांनी प्रत्येक विभागांच्या अधिकाऱ्यांकडून तक्रारी व सूचना ऐकून घेतल्या. पुढे बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्र ही ग्राहक चळवळीची जन्मभूमी आहे. तरीही ही चळवळ ग्राहकांपर्यंत अद्याप पोहचली नाही. त्यासाठी ग्राहक चळवळीचे स्वतंत्र खाते करावे त्याच बरोबर ग्राहक सचिव आणि या खात्यासाठी वेगळ्या बजेटची तरतूद करावी. चांगले काम करणारे अधिकारी व कर्मचारी तसेच व्यक्ती व संस्थांचा शासनाने पुरस्कार देवून गौरव करावा. ग्राहक कल्याण नवनीत ही पुस्तिका शासकीय यंत्रणेमार्फत घराघरापर्यंत पोहचावी. या मागण्या शासनस्तरावर मांडण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. यानंतर ग्राहक चळवळीत काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत त्यांनी बैठक घेवून ग्राहकांसदर्भातील तक्रारी व सूचना तसेच त्यावर उपाय योजना संबंधी चर्चा केली. यावेळी ग्राहक समितीचे अध्यक्ष धनंजय मुलकलवार, ग्राहक पंचायतीचे सदस्य प्रेमराज मोहोकार, श्रीमती सातोरकर, अविनाश बालपांडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, उपनिबंधक अजय कडू तसेच ग्राहक संघटनाचे प्रतिनिधी, राशन दुकानदार असोसिएशनचे अध्यक्ष संजय भांबोरे उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)