शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान निवारा योजनेच्या यादीतून गरजू लाभार्थ्यांना वगळले

By admin | Updated: June 14, 2016 00:22 IST

पंतप्रधान निवारा योजनेंतर्गत २०११ ला सर्वे करण्यात आले होते. ती यादी तालुका महसूल प्रशासनाकडे सादर झाली आहे.

चौकशीची मागणी : यादीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचा समावेशपालोरा : पंतप्रधान निवारा योजनेंतर्गत २०११ ला सर्वे करण्यात आले होते. ती यादी तालुका महसूल प्रशासनाकडे सादर झाली आहे. या यादीमध्ये अनेक त्रुट्या असून, गरजू लाभार्थ्यांचे नाव वगळण्यात आल्यामुळे जनतेमध्ये रोष निर्माण झाला आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन गरजू लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात यावे अशी मागणी जनतेनी केली आहे.दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला पक्के घर मिळण्याकरिता शासनाकडून अनेक योजनेद्वारे घरकुल दिल्या होते. २००२ च्या बीपीएल यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला होता. सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गरजू लोकांना वगळून धनाढ्य लोकांचे नाव समाविष्ठ करण्यात आले होते. त्यामुळे अनेक गरजू कुटूंब शासनाच्या अनेक योजनेपासून वंचित होते. मात्र अजूनपर्यंत नव्याने बीपीएल यादी मंजूर न झाल्यामुळे नव्याने यादी केव्हा प्रकाशित होणार म्हणून जनता प्रतीक्षेत आहेत. गत सन २०११ ला दारिद्रय रेषेखाली जीवन जगणाऱ्या कुटूंबाचे सर्वे करण्यात आले होते. यात जि.प. शिक्षक व संगणक परिचराचा समावेश होता. मागील महिन्यात पंतप्रधान निवारा योजनेच्या नावाने ही यादी प्रकाशित करण्यात आली आहे. या यादीमध्ये अनेक शासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ज्याकडे पक्के घर, शेती आहे. ज्यांना पुर्वी इंदिरा आवास योजना, रमाबाई योजना अशा अनेक योजनेचा लाभ मिळाला आहे. अशा लाभार्थ्यांचे नाव समाविष्ट आहेत. जे लाभार्थी स्वर्गवासी झाले आहेत. ज्या कर्मचाऱ्यांनी सर्वे केले आहेत. यांना गरजू लाभार्थी दिसले नाहीत का? असा प्रश्न पुढे येत आहे. ज्या लाभार्थ्यांकडे पक्के घर आहे किंवा ज्या लाभार्थ्यांना अशा योजनेचा लाभ मिळाला आहे. अशा लाभार्थ्यांचे नाव कमी करण्याचा शासनाने आदेश दिले आहेत. मात्र जे लाभार्थी गरजू आहेत ज्या लाभार्थ्यांचे नाव समाविष्ट करण्याचे आदेश दिले गेले नसल्यामुळे गरजू कुटुंबांना पक्के घर बाधायला मिळेल किवा नाही, असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे. मागील २० वर्षापुर्वी इंदिरा आवस योजनेंतर्गत ४२ हजारांचा धनादेश दिला जात होता. इतक्या रकमेत घर होत नसल्यामुळे कसेबसे कवेलूचे घर तयार केले होते. सध्याला धनादेशात वाढ झाल्यामुळे पक्के घर ते लाभार्थी बांधू शकतात. अशा लाभार्थ्यांना पंतप्रधान निवारा योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी होत आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी २०११ याबाबत सर्वे केले होते. त्यांनी हा सर्वे घरी बसून केल्याचे दिसून येत आहे. अशा कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी व गरजू कुटुंबाचे सर्वे करुन लाभ देण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परीषद सदस्य मनोरमा जांबुळे यांनी केली आहे. (वार्ताहर)