शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

‘महावेध’ देणार शेतकऱ्यांना अचूक हवामानाचा वेध

By admin | Updated: March 25, 2017 00:33 IST

राज्यातील शेतकऱ्यांनी हवामान विषयक माहिती आणि त्यानुसार कृषी विषयक सल्ला देण्यासाठी महसूल मंडळस्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे.

दर १० मिनिटांनी नोंदविली जाणार माहिती : सहा महिन्यांत सुरु होणार २०६५ पेक्षा जास्त केंद्र भंडारा : राज्यातील शेतकऱ्यांनी हवामान विषयक माहिती आणि त्यानुसार कृषी विषयक सल्ला देण्यासाठी महसूल मंडळस्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी स्कायमेट वेदर सर्व्हिसेस या कंपनीची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यात २०६५ पेक्षाही जास्त ठिकाणी हवामान केंद्र सहा महिन्यात कार्यान्वित होणार आहेत. बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका कृषी क्षेत्राला बसत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरेल आणि कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढेल यासाठी प्रत्येक महसूल मंडळस्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करुन हवामानविषयक माहिती ‘महावेध प्रकल्प’ राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. हवामान विषयक माहितीचा पिक विमा योजना व कृषीविषयक सल्ला व मार्गदर्शन, आपत्ती व्यवस्थानासह अन्य क्षेत्रात उपयोग होऊ शकतो. (नगर प्रतिनिधी)हवामान विषयक माहिती मिळणार मोफत स्कायमेट वेदर सर्व्हिसेस या कंपनीची महावेध प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सेवा पुरवठादार संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे. या संस्थेमार्फत राज्यात सर्व महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी केली जाणार असून ७ वर्षाकरीता महावेध प्रकल्प स्वखर्चाने राबविण्यात येणार आहे. शासनास हवामान विषयक मोफत माहिती पुरविण्याची जबाबदारी या संस्थेची असणार आहे. सरकारी जागा उपलब्ध करणार सर्व महसूली मंडळामध्ये स्वयंचलित हवामान केंद्राच्या उभारणीकरीता ५ मीटर बाय ७ मीटर जागा शासन उपलब्ध करुन देईल. सर्व महसूली मंडळामध्ये प्राधान्याने वनेत्तर शासकीय जागा उपलब्ध करुन देण्यात येईल ज्या ठिकाणी शासकीय जागा उपलब्ध होणार नाही त्याठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व अन्य निमशासकीय संस्थांच्या जागा उपलब्ध करुन दिल्या जातील. महावेध प्रकल्पांतर्गत प्रत्येक महसूल मंडळामध्ये संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शासकीय जागेचा ताबा घेण्याच्या कार्यवाहीचे कृषि आयुक्तांच्या माध्यमातून सनियंत्रण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे नोडल अधिकारी राहणार आहेत.सहा महिन्यात केंद्राची उभारणी महावेध प्रकल्पांतर्गत सर्वसाधारण प्रदेशामध्ये १२ कि.मी. बाय १२ कि.मी. अंतरावर आणि डोंगराळ भागात ५ कि.मी. बाय ५ कि.मी. अंतरावर हवामान केंद्राची उभारणी केली जाणार आहे. जागा हस्तांतरीत केल्यापासून सहा महिन्यात हवामान केंद्राची उभारणी पूर्ण करावयाची आहे. १० मिनिटांनी माहिती नोंदविली जाणारप्रत्येक स्वयंचलित हवामन केंद्राद्वारे तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्यांचा वेग आणि दिशा या हवामान विषयक घटकाची अद्ययावत वेळेच्या माहितीची दर १० मिनिटांनी डेटा लॉगरमध्ये नोंद घेतली जाणार आहे. ही माहिती दर एक तासांनी सर्व्हरला पाठविली जाईल. उपलब्ध होणारी हवामान विषयक माहितीचा शासन अर्थसहाय्यित पिक विमा योजनांकरीता अधिकृत हवामान विषयक माहिती म्हणून उपयोग करण्यात येईल. महावेध प्रकल्पांतर्गत शासनास दैनंदिन मोफत प्राप्त होणाऱ्या अद्ययावत वेळेच्या हवामान विषयक माहितीचा जनहितार्थ उपयोग करण्यात येईल. लहरी हवामानापासून कृषी क्षेत्राला संरक्षण देण्यासाठी महावेध प्रकल्प हवामानाचा अचूक वेध घेऊन शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरण्यास मदत होणार आहे.