शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘त्या’ प्रकरणातील बालकाचा मेडिकलमध्ये मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:40 IST

नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक घेण्यात आली होती या निवडणुकीत अनेक गावांत परवानगी नसतानाही उमेदवारांनी विजयी मिरवणूक काढली. दहेगाव येथे सुद्धा ...

नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक घेण्यात आली होती या निवडणुकीत अनेक गावांत परवानगी नसतानाही उमेदवारांनी विजयी मिरवणूक काढली. दहेगाव येथे सुद्धा दोन्ही गटांच्या उमेदवारांनी १८ जानेवारीला सायंकाळीू ६ वाजण्याच्यादरम्यान विजयी मिरवणूक काढली. एका रस्त्यावर दोन्ही मिरवणूक समोरासमोर आल्यावर त्यांच्यात वाद झाला. या वादात तेजस गोमासे (१७) या मुलाच्या डोक्याला दुखापत होऊन तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तत्काळ मोहाडी येथील एका खासगी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, डोक्याला मार असल्याने त्याला नंतर भंडारा व नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले होते. या घटनेची तक्रार तब्बल दहा दिवसांनंतर २७ जानेवारीला पोलिसांत करण्यात आल्यावर पोलिसांनी कलम ३०७, १४३,१४७,१४९ भादंविनुसार गुन्हा नोंद करून आरोपी विपुल कडव (३०), नितीन राखडे (२५), गौरी सेलोकर (३१), रघुनाथ कडव (३०), नितीन कडव (२५) या पाच युवकांना अटक केली होती. मात्र, उपचारा दरम्यान दोन फेब्रुवारीला तेजसचा मृत्यू झाल्याने आरोपी विरुद्ध कलम ३०२ सुध्दा लावण्यात येणार आहे. या प्रकरणाचा तपास पो. नि. राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक आर. गायकवाड, अंमलदार मयूर सिंगनजुडे हे करत आहेत.