शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कुठं आहे गा कोरोना म्हणणारेही आता चांगलेच धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 05:00 IST

मोहाडी तालुक्यात वृक्ष संगोपन, मालगुजारी तलावातील गाळ काढणे, पाटबंधारे नहर दुरुस्ती, मजगी, गुरांचे शेड, पांदण रस्ते, घरकुल आदी १६६ कामे सुरू आहेत. त्यात १ हजार ९४० मजूर उपस्थित आहेत. त्यातील पांदण रस्ते ४ सुरू असून, त्यावर १ हजार ११३ मजुरांची ६ एप्रिलपर्यंत उपस्थिती होती. मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात कमीच होता. 

ठळक मुद्देग्रामीण भागात रोहयोच्या कामातून अलगद शिरकाव

राजू बांतेलोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी :  कुठं आहे गा कोरोना... शहरावालेच बघा, असे म्हणणारी आता खेड्यातील जनताही कोरोनाच्या प्रकोपाने धास्तावल्याचे दिसत आहे. कशाचीच पर्वा न करता पोटासाठी रोजगार हमी योजनेच्या कामावर जात आहेत. तालुक्यात रोजगार हमीचे काम धडाक्याने सुरू आहेत. मात्र, इथे शासनाने घालून दिलेल्या नियमांचा पालन केल्याचे दिसून येत नाही. काही गावातील रोजगार हमीवर जाणाऱ्या मजुरांची अँटिजेन चाचणी केली गेली. त्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तेथून कोरोनाचा अलगद शिरकाव होण्याची भीती आहे. थव्याने कामावर जाणारे मजूर निर्बंध झुगारत असल्याने कोरोनाच्या विळख्यात गावच्या गाव येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.मोहाडी तालुक्यात वृक्ष संगोपन, मालगुजारी तलावातील गाळ काढणे, पाटबंधारे नहर दुरुस्ती, मजगी, गुरांचे शेड, पांदण रस्ते, घरकुल आदी १६६ कामे सुरू आहेत. त्यात १ हजार ९४० मजूर उपस्थित आहेत. त्यातील पांदण रस्ते ४ सुरू असून, त्यावर १ हजार ११३ मजुरांची ६ एप्रिलपर्यंत उपस्थिती होती. मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात कमीच होता. सध्या मात्र परिस्थिती जिल्ह्यात विदारक बनली आहे. ग्रामीण भागात कोरोना विषाणूने शिरकाव केला. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र या ठिकाणी कोविड-१९ च्या विषाणूची तपासणीसाठी शिबिर लावले गेले. पण, स्वतःहून अँटिजेन तपासणी करायला पुढे येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. मोहाडी तालुक्यातील आंधळगाव, बेटाळा, जांब, करडी, वरठी या प्राथमिक केंद्रात तसेच डोंगरगाव, कान्हळगाव, धुसाळा, हरदोली, धोप, कांद्री, हिवरा, उसर्रा, मुंढरी, पालोरा, जांभोरा, देव्हाडा, नीलज, नेरी, सातोना, मांडेसर या प्राथमिक उपकेंद्रात २५ दिवसात ६ एप्रिलपर्यंत १५ हजार ७ नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे. यावरून लसीकरण करण्यास जनता किती अनुत्सुक आहे हे स्पष्ट होते. त्याचा परिणाम संपूर्ण गावातील जनतेला सहन करावा लागत आहे.  

मजुरांची चाचणी करा रोजगार हमी योजनेच्या कामावर येणाऱ्या मजुरांची कोविड-१९ चाचणी करावी. मजुरांनी चाचणी झालेले प्रमाणपत्र सोबत आणावे तसेच कामावर सामाजिक अंतर राखणे, मास्क घालणे, हात धुण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच कोविड-१९ प्रतिबंधक लस घेण्याबाबत लेखी सूचना रोजगार हमी संबंधित अधिकाऱ्यांना तहसीलदार देवीदास बोंबर्डे यांनी दिल्या आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या