कुठं आहे गा कोरोना म्हणणारेही आता चांगलेच धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 05:00 AM2021-04-08T05:00:00+5:302021-04-08T05:00:50+5:30

मोहाडी तालुक्यात वृक्ष संगोपन, मालगुजारी तलावातील गाळ काढणे, पाटबंधारे नहर दुरुस्ती, मजगी, गुरांचे शेड, पांदण रस्ते, घरकुल आदी १६६ कामे सुरू आहेत. त्यात १ हजार ९४० मजूर उपस्थित आहेत. त्यातील पांदण रस्ते ४ सुरू असून, त्यावर १ हजार ११३ मजुरांची ६ एप्रिलपर्यंत उपस्थिती होती. मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात कमीच होता. 

Even those who say Ga Corona is scared now | कुठं आहे गा कोरोना म्हणणारेही आता चांगलेच धास्तावले

कुठं आहे गा कोरोना म्हणणारेही आता चांगलेच धास्तावले

Next
ठळक मुद्देग्रामीण भागात रोहयोच्या कामातून अलगद शिरकाव

राजू बांते
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी :  कुठं आहे गा कोरोना... शहरावालेच बघा, असे म्हणणारी आता खेड्यातील जनताही कोरोनाच्या प्रकोपाने धास्तावल्याचे दिसत आहे. कशाचीच पर्वा न करता पोटासाठी रोजगार हमी योजनेच्या कामावर जात आहेत. तालुक्यात रोजगार हमीचे काम धडाक्याने सुरू आहेत. मात्र, इथे शासनाने घालून दिलेल्या नियमांचा पालन केल्याचे दिसून येत नाही. काही गावातील रोजगार हमीवर जाणाऱ्या मजुरांची अँटिजेन चाचणी केली गेली. त्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तेथून कोरोनाचा अलगद शिरकाव होण्याची भीती आहे. थव्याने कामावर जाणारे मजूर निर्बंध झुगारत असल्याने कोरोनाच्या विळख्यात गावच्या गाव येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
मोहाडी तालुक्यात वृक्ष संगोपन, मालगुजारी तलावातील गाळ काढणे, पाटबंधारे नहर दुरुस्ती, मजगी, गुरांचे शेड, पांदण रस्ते, घरकुल आदी १६६ कामे सुरू आहेत. त्यात १ हजार ९४० मजूर उपस्थित आहेत. त्यातील पांदण रस्ते ४ सुरू असून, त्यावर १ हजार ११३ मजुरांची ६ एप्रिलपर्यंत उपस्थिती होती. मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात कमीच होता. 
सध्या मात्र परिस्थिती जिल्ह्यात विदारक बनली आहे. ग्रामीण भागात कोरोना विषाणूने शिरकाव केला. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र या ठिकाणी कोविड-१९ च्या विषाणूची तपासणीसाठी शिबिर लावले गेले. पण, स्वतःहून अँटिजेन तपासणी करायला पुढे येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. 
मोहाडी तालुक्यातील आंधळगाव, बेटाळा, जांब, करडी, वरठी या प्राथमिक केंद्रात तसेच डोंगरगाव, कान्हळगाव, धुसाळा, हरदोली, धोप, कांद्री, हिवरा, उसर्रा, मुंढरी, पालोरा, जांभोरा, देव्हाडा, नीलज, नेरी, सातोना, मांडेसर या प्राथमिक उपकेंद्रात २५ दिवसात ६ एप्रिलपर्यंत १५ हजार ७ नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे. यावरून लसीकरण करण्यास जनता किती अनुत्सुक आहे हे स्पष्ट होते. त्याचा परिणाम संपूर्ण गावातील जनतेला सहन करावा लागत आहे. 
 

मजुरांची चाचणी करा
 रोजगार हमी योजनेच्या कामावर येणाऱ्या मजुरांची कोविड-१९ चाचणी करावी. मजुरांनी चाचणी झालेले प्रमाणपत्र सोबत आणावे तसेच कामावर सामाजिक अंतर राखणे, मास्क घालणे, हात धुण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच कोविड-१९ प्रतिबंधक लस घेण्याबाबत लेखी सूचना रोजगार हमी संबंधित अधिकाऱ्यांना तहसीलदार देवीदास बोंबर्डे यांनी दिल्या आहेत.

 

Web Title: Even those who say Ga Corona is scared now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.