शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
3
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
4
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
5
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
6
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
7
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
9
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
10
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
13
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
14
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
15
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
16
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
17
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
18
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
19
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
20
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणरायाची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 05:00 IST

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने अटी व शर्तीच्या अधिन राहून गणपतीची स्थापना करण्याचे निर्देश दिले होते. मंडळांनाही अगदी साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे निर्देश दिले होते. गणेशपुरचा राजा, भंडाराचा राजा यासह विविध मंडळांनी प्रशासनाला पूरक भूमिका घेत यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे निश्चित केले. त्यानुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाची स्थापना करण्यात आली.

ठळक मुद्देजिल्ह्यात १३४ सार्वजनिक मंडळ । १०६ गावांत एक गाव एक गणपती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दरवर्षीचा उत्साह, जोश आणि ढोलताशांचा कडकडाट नसला तरी गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात लाडक्या गणरायाची स्थापना गणेशभक्तांनी अगदी साधेपणात केली. जिल्ह्यात १३४ सार्वजनिक मंडळांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अटी व शर्तीचे पालन करीत गणरायाची स्थापना केली. तर १०६ गावात एक गाव एक गणपती उपक्रम राबविला जात आहे. कोरोना संसर्गाची भीती असली तरी भक्तांच्या उत्साहात मात्र कुठेही कमी दिसत नव्हती. विघ्नहर्त्याने कोरोनाचे विघ्न नष्ट करावे अशी मनोमन प्रार्थना करीत गणपती बाप्पाला अनेकांनी आपल्या घरी स्थापन केले.जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने अटी व शर्तीच्या अधिन राहून गणपतीची स्थापना करण्याचे निर्देश दिले होते. मंडळांनाही अगदी साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे निर्देश दिले होते. गणेशपुरचा राजा, भंडाराचा राजा यासह विविध मंडळांनी प्रशासनाला पूरक भूमिका घेत यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे निश्चित केले. त्यानुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाची स्थापना करण्यात आली. भंडारा शहरासह साकोली, तुमसर, मोहाडी, पवनी, लाखनी, लाखांदूर तालुक्यातही उत्साहात गणेशाची स्थापना झाली आहे. यावर्षी कोरोना संसर्गामुळे १३४ सार्वजनिक मंडळांनी गणरायाची स्थापना केल्याची माहिती आहे. तर एक गाव एक गणपती उपक्रमाला १०६ गावांनी प्रतिसाद दिला.भंडारा भंडारा शहरासह साकोली, तुमसर, मोहाडी, पवनी, लाखनी, लाखांदूर तालुक्यातही उत्साहात गणेशाची स्थापना झाली आहे. भंडारा शहरातील गांधी चौक, बडा बाजार, दसरा मैदान आणि मूर्तीकारांच्या घरी गणरायाला आपल्या घरी नेण्यासाठी भाविकांची वर्दळ सकाळपासून दिसत होती. यासोबतच शहरातील चौकाचौकात फुल हार, पूजेचे साहित्य विक्रेत्यांची दुकानेही मोठ्या प्रमाणात थाटली होती. फिजीकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवित मोठ्या प्रमाणात खरेदी सुरु होती.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवMaharashtraमहाराष्ट्र