शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारांना मिळाले ‘रोजगारी’चे बळ

By admin | Updated: September 21, 2016 00:33 IST

सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार नसल्याने बेरोजगारांची फौज तयार होत आहे. अशा होतकरू युवकांना रोजगार उपलब्ध व्हावे ...

५५० लाभार्थी : कौशल्य विकास कार्यक्रमभंडारा : सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार नसल्याने बेरोजगारांची फौज तयार होत आहे. अशा होतकरू युवकांना रोजगार उपलब्ध व्हावे यासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत आज भंडारा पंचायत समिती सभागृहात बेरोजगार मेळावा घेण्यात आला. यात ५१० युवकांची निवड करण्यात आली आहे. या माध्यमातून त्यांना एका नव्या उमेदीचे बळ मिळाले आहे.राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेअंतर्गत भंडारा पंचायत समितीच्या सहकार्यातून हा बेरोजगार मेळावा घेण्यात आला. पंचायत समिती सभागृहात आयोजित या मेळाव्याला ग्रामीण तथा शहरी भागातील युवकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. यात ५१० युवक युवतींची नोंदणी करण्यात आली. या मेळाव्याला पंचायत समिती सभापती प्रल्हाद भुरे, संवर्ग विकास अधिकारी मंजुषा ठवकर, उपसभापती व सर्व पंचायत समिती सदस्य, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, तालुका समन्वयक माधुरी पांढरे, प्रशांत बिलवणे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सरोजीनी खोब्रागडे, गौतम कहाळे, गौतम पाटील, प्रदीप दांडगे, स्वाती तिवारी, विस्तार अधिकारी अतुल वर्मा आदींची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करून या कार्यशाळेच्या माध्यमातून बेरोजगारीवर मात करावी व स्वत:ला स्वयंसिद्ध करावे असे आवाहन करण्यात आले. मुलाखती झाल्यानंतर नागपूर येथे प्रशिक्षण देण्यात येईल. यावेळी शासन एका विद्यार्थ्यावर सुमारे ३० हजार रुपयांचा खर्च करणार आहे. दरम्यान तीन महिन्यांचे मोफत प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. यात त्यांना कमीत कमी सहा हजार रुपये मानधन मिळेल. अशा या मेळाव्याने उपस्थित बेरोजगारांना खरोखरच रोजगाराची एक नवे दालन उघडण्याची प्रतिक्रिया युवक - युवतींनी यावेळी व्यक्त केली. (शहर प्रतिनिधी)